ETV Bharat / entertainment

मेरी ख्रिसमस स्क्रीनिंगला कथित लव्हबर्ड्स अनन्या - आदित्य आणि खुशी - वेदांगने वेधले लक्ष

Merry Christmas screening: कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांचा प्रतीक्षित चित्रपट मेरी ख्रिसमस १२ जानेवारीला थिएटरमध्ये येणार आहे. या अगोदर निर्मात्यांनी बी-टाऊन सेलेब्ससाठी खास स्क्रीनिंगचे आयोजन केले होते. याला कथित लव्हबर्ड्स अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर आणि खुशी कपूर आणि वेदांग रैना यांनी हेजरी लावली होती.

Merry Christmas screening
मेरी ख्रिसमस स्क्रीनिंग
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 11, 2024, 11:40 AM IST

मुंबई - Merry Christmas screening: 'टायगर 3' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या यशानंतर कतरिना कैफ तिचा आगामी चित्रपट 'मेरी ख्रिसमस'साठी सज्ज झाली आहे. यामध्ये ती पहिल्यांदाच विजय सेतुपतीसोबत काम करत आहे. या चित्रपटाचं प्रदर्शन 12 जानेवारी 2024 पासून सुरू होणार असून त्यापूर्वी निर्मात्यांनी मनोरंजन व्यवसायातील प्रमुख व्यक्तींसाठी खास स्क्रिनिंगचं आयोजन केलं होतं. यामध्ये बॉलिवूडचे कथित लव्हबर्ड्स अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर आणि खुशी कपूर आणि वेदांग रैना यांनी उपस्थिती लावली होती.

'मेरी ख्रिसमस'च्या निर्मात्यांनी बॉलिवूडमधील ए-लिस्टरसाठी विशेष स्क्रीनिंग आयोजित केले होते. यासाठी उपस्थित राहिलेल्या फिल्म इंडस्ट्रीतील सेलेब्रिटींनी लक्ष वेधून घेतले. आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे या कथित जोडप्यानेही ते स्क्रीनिंगवर आल्यावर फोटो काढले. अनन्याने यावेळी पांढरा सलवार-कमिज परिधान करत तिच्या सुंदर केशरचनेने सर्वांचं लक्ष वेधून घेतले होते. तर आदित्य रॉय कपूर कॅज्युअल ड्रेसमध्ये हँडसम दिसत होता.

या स्क्रिनिंगला लव्हबर्ड्स खुशी कपूर आणि वेदांग रैना यांच्या उपस्थितीने प्रेक्षकांमध्ये उत्साह जाणवला. वेदांगने ब्राऊन जॅकेट आणि मॅचिंग ट्राउझर्ससह पांढरा शर्ट घातला होता, तर खुशी मॅचिंग हँडबॅगसह संपूर्ण-ब्लश गुलाबी पोशाखात आली होती. दोघांनी 2023 मध्ये झोया अख्तरच्या 'द आर्चिज' चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले.

मृणाल ठाकूर, कबीर खान, दिग्दर्शक श्रीराम राघवन, निर्माता रमेश तौरानी, चित्रपट निर्माते राजकुमार हिरानी, नेहा धुपिया, सनी कौशल, चंकी पांडे, अपरशाक्ती खुराना, राधिका मदान, हिमेश रेशमिया, नील नितीन मुकेश या सारख्या सेलिब्रिटींनी स्क्रिनिंगला हजेरी लावली होती.

'मेरी ख्रिसमस' चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीराम राघवन या चित्रपटाबद्दल बोलताना तमिळ चित्रपटसृष्टीत कतरिनाच्या पदार्पणाबद्दल कौतुक केलं. दिग्दर्शकाने या चित्रपटाच्या हिंदी आणि तमिळ दोन्ही आवृत्त्या एकाच वेळी शूट केल्या होत्या. कतरिनाच्या समोर अभिनीत दक्षिण स्टार विजय सेतुपती आहे.

हेही वाचा -

  1. महात्मा फुलेंच्या जीवनावरील 'सत्यशोधक' चित्रपट झाला करमुक्त
  2. कतरिना कैफ विजय सेतुपती स्टारर 'मेरी ख्रिसमस'मधील पहिलं गाणं प्रदर्शित
  3. शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन स्टारर चित्रपटाचं शीर्षक ठरलं, पोस्टर रिलीज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.