मुंबई : सत्ताधारी मित्रपक्ष शिवसेनेच्या नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी त्यांच्या माजी सहकाऱ्याविरुद्ध मानहानीची तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यावर जीवे मारण्याच्या धमक्या आणि माफिया संबंधांचा आरोप केला आहे, असे उद्योगातील सूत्रांनी सोमवारी सांगितले. नोव्हेंबर 2022 मध्ये सीएम एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सामील झालेल्या सय्यद यांच्याविरोधात त्यांचा माजी पीए बाबुराव शिंदे याने आरोप केले होते. यानंतर काही दिवसांनी अभिनेत्री दीपाली यांनी मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
माफिया डॉनशी संबंध : आरोपांमध्ये सय्यद यांनी पाकिस्तानी नागरिकत्व घेतले होते. लंडन आणि दुबईमध्ये मालमत्ता खरेदी केली होती आणि पाकिस्तानातील माफिया डॉनशी संबंध असल्याचे स्पष्ट केले. ओशिवरा पोलिसांनी शिंदेवर विविध आयपीसी आरोपाखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
फसवणुकीचे आरोप : त्यांचे खरे नाव 'सोफिया सय्यद' असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. त्यांनी पाकिस्तानचे नागरिकत्व घेतले. तेथे बँक खाते चालवले, पण भारतात राहण्यासाठी बनावट पासपोर्ट मिळवला. त्यांनी जोडप्यांसाठी सामूहिक विवाह आयोजित करणार्या धर्मादाय ट्रस्टच्या माध्यमातून फसवणुकीचे आरोप लावल्याचा आणि इकबाल इब्राहिम कासकर सोबतचे त्यांचे फोटो मॉर्फ केल्याचा आरोपही शिंदे यांनी केला. अभिनेत्री दीपाली यांनी सांगितले की, त्यांनी एका मराठी चित्रपटासाठी अनधिकृत ऑडिशन घेतल्याचे कळल्यानंतर त्यांनी शिंदे यांची हकालपट्टी केली.
फडवणीसांकडे केली अनेकदा तक्रार : दीपाली सय्यद म्हणाल्या की, माझ्यावर आणि माझ्या ट्रस्टवर करण्यात आलेले आरोप हे अत्यंत चुकीचे आहेत. माझ्या नावाचा वापर करून लोकांकडून पैसे घेतल्याचा आरोप करणाऱ्यांना मी पकडले आहे. दुसरीकडे भाऊसाहेब शिंदे म्हणाले, की उपमुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे अनेकदा तक्रार करून पुरावे ही दिले, तरी दीपाली सय्यद यांच्यावर कारवाई होत नाही. दीपाली सय्यद यांच्यावर कारवाई नाही केली तर भविष्यात गृहराज्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा भाऊसाहेब शिंदे यांनी फडवणीसांना दिला आहे.
हेही वाचा : Kapil Sharma Thanks Alia Bhatt : कपिल शर्माने आलिया भट्टचे मानले आभार; 'हे' आहे कारण