फ्रान्स: फ्रान्सच्या फ्रेंच रिव्हिएरामध्ये 76 व्या कान फिल्म फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे. हा महोत्सव १६ मे ते २७ मे या कालावधीत चालणार आहे. यामुळे जगभरातील सेलेब्स हे स्वत;ला आकर्षक दाखविण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहेत. या वर्षी अनेक बॉलीवूडच्या अभिनेत्रींनी कान्समध्ये पदार्पण केले आहे. दरम्यान, आता माजी मिस वर्ल्ड आणि अभिनेत्री मानुषी छिल्लरचा कान्स लूक समोर आला आहे. मानुषी छिल्लर मंगळवारी कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर भव्य हजेरी लावली. मानुषी तिच्या विलक्षण गाउनमध्ये वास्तविक जीवनातील राजकुमारीसारखी दिसत होती.
मानुषी छिल्लर एन्ट्री : सारा अली खाननंतर आता मानुषी छिल्लरने कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर पदार्पण केले आहे. सारा अली खानने देसी स्टाईलमध्ये लोकांची मने जिंकली तर मानुषी छिल्लर यावेळी सुंदर पांढऱ्या रंगाच्या फोवरी गाऊन परिधान करून गळ्यात हिरव्या स्टोन डायमंडचे नेकलेसह तिने स्ट्रॅपी निऑन हील्स घातले होते . मानुषी छिल्लरने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावत कार्यक्रमाला गवसणी घातली. या कार्यक्रमामधील मानुषीचे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यापूर्वी, मुंबई विमानतळावरून मानुषी छिल्लर कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023साठी निघतानाचे व्हिडिओ हे सोशल मीडियावर पापाराझीने शेअर केले होते या व्हिडिओंमध्ये, मानुषीला ब्लू जीन्स, पांढरा टँक टॉप आणि तपकिरी बूटमध्ये दिसत होती. त्यानंतर मानुषीने विमानतळावर पापाराझींना पोजही दिली होती. मानुषीने 2017 मध्ये मिस वर्ल्डचा किताब मिळवला होता.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
वर्क फ्रंट : अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित कॉमेडी द ग्रेट इंडियन फॅमिलीमध्ये विकी कौशलसोबत रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. तसेच ती 'तेहरान' या चित्रपटात जॉन अब्राहमसोबत दिसणार आहे. याशिवाय वरुण तेजसोबत तिचा 'ऑपरेशन व्हॅलेंटाइन'मध्ये ती झळकणार आहे. हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस रिलीज होणार आहे. यापुर्वी तिने 2022 मध्ये अक्षय कुमारसोबत चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित सम्राट पृथ्वीराज या अॅक्शन ड्रामामधून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तिने पृथ्वीराजची पत्नी राजकुमारी संयोगिता हिची भूमिका साकारली होती. मात्र हा चित्रपट प्रेक्षकांना फारसा पसंतीला उतरला नव्हता. आता आगामी येणाऱ्या चित्रपटापासून तिला फार अपेक्षा आहे.