मुंबई : छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत आपला ठसा उमटवणारा मनीष पॉल आज त्याचा ४२ वा वाढदिवस साजरा करत आहे. ३ ऑगस्ट १९८१ रोजी मालवीय नगर, दिल्ली येथे जन्मलेला मनीषला आज सर्वजण ओळखतात. मनीष एक होस्ट, अभिनेता म्हणून मनोरंजन विश्वाचा चेहरा बनला आहे. मनीष पॉल अनेकदा त्याच्या कॉमिक टायमिंगने लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणतो. आरजे आणि व्हीजे म्हणून कारकिर्दीची सुरुवात करून, त्याने स्टँड-अप कॉमेडी आणि होस्टिंगपासून अभिनयापर्यंतचा प्रवास केला आणि लोकांच्या नजरेत आला. मनीष अनेकदा अवार्ड शोची देखील होस्टिंग करतो. त्याची होस्टिंग ही सर्वांनाच खूप आवडते. आज मनी षबद्दल जाणून घेवूया काही विशेष गोष्टी.....
करिअरची सुरुवात कशी झाली : मनीष पॉल दिल्लीत शिक्षण पूर्ण करून मुंबईत आला. मनीष जेव्हा इंडस्ट्रीत आपले नाव आणि स्थान निर्माण करण्यासाठी धडपडत होता. तेव्हा त्याची पत्नी संयुक्ताने त्याला साथ दिली. २००२ मध्ये मनीषला त्याचा पहिला शो 'संडे टँगो' होस्ट करण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने व्हीजे म्हणून काम करण्यास सुरुवात केली. रेडिओ सिटीमध्ये आरजे बनला. 'कसकाये मुंबई' या मॉर्निंग शोचे सूत्रसंचालन केले. या शोद्वारे तो हळूहळू लोकप्रिय होऊ लागला.
बालपणीचा मित्र विवाहित : मनीष पॉलने २००७ मध्ये त्याची बालपणीची मैत्रीण संयुक्तासोबत लग्न केले. दोघे शालेय दिवसांपासून एकमेकांना ओळखत होते आणि १९९८ पासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघांना एक मुलगी आणि मुलगा आहे. मनीषने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, तो लग्नापूर्वी करिअरबाबत इतका गंभीर नव्हता. संयुक्तानेच त्याच्या आयुष्यात खूप काही बदलविले. तिच्यामुळे तो इथपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाला.
या चित्रपट आणि मालिकांमध्ये दिसले : मनीष पॉल टीव्ही शो आणि चित्रपट या दोन्हींचा भाग आहे. मनीषने 'भूत बना दोस्त', 'राधा की बेटीयों' 'कुछ कर दिखी', 'जिंदादिल', 'कहानी शुरू विथ लव्ह गुरू' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. याशिवाय तो अक्षय कुमार आणि कतरिना कैफसोबत 'तीस मार खान'मध्ये दिसला होता. २०१३ मध्ये त्याने 'मिकी व्हायरस' चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले. दरम्यान आता तो नुकताच 'जुग जुग जिओ'मध्ये दिसला होता. याशिवाय तो अनेक अवॉर्ड फंक्शन्स होस्ट करताना दिसत आहे.
हेही वाचा :