ETV Bharat / entertainment

Mami Film festival 2023 : मामी फिल्म फेस्टीव्हलमध्ये प्रियांका चोप्रानं भूमी पेडणेकरवर उधळली स्तुती सुमनं

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 30, 2023, 4:49 PM IST

Mami Film festival 2023 : मामी फिल्म फेस्टीव्हल 2023 मध्ये प्रियांका चोप्रा आणि भूमी पेडणेकर यांच्या गप्पांचा फड रंगला होता. या महोत्सवात प्रियांकानं 'द माइंड ऑफ अ‍ॅन अ‍ॅक्टर' या विषयावर एक मास्टरक्लास घेतला. या सत्राचं सूत्रसंचालन भूमी पेडणेकर हिनं केलं.

Mami Film festival 2023
प्रियांका चोप्रानं भूमी पेडणेकरवर उधळली स्तुती सुमनं

मुंबई - Mami Film festival 2023 : मुंबईत मामी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला उत्साहात सुरुवात झालीय. यासाठी ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा खास उपस्थित राहिली आहे. रविवारी या चित्रपट महोत्सवात प्रियांकानं 'द माइंड ऑफ अ‍ॅन अ‍ॅक्टर' या विषयावर एक मास्टरक्लास घेतला. या खास सत्राचं सूत्रसंचालन भूमी पेडणेकर हिनं केलं होतं. यामध्ये या दोन आघाडीच्या अभिनेत्री एकमेकांबद्दल खूप बोलत होत्या. प्रियंका म्हणाली, 'भूमी, माझ्यासाठीही एक प्रेरणास्थान आहेस कारण तू केलेल्या निवडी, तू सादर केलेली पात्रं आणि तुझ्या पात्रांना तू ज्या सन्मानाने साथ दिलीस त्या दृष्टीने तुझा प्रवास खूप छान आहे.'

प्रियांकानं भूमीला विचारलं, 'दम लगा के हयशासाठी तुला किती वजन उचलावे लागले?' यावर भूमीनं उत्तर दिलं, मी ३० किलोंहून अधिक वजन जोडलं, त्यानंतर मी मोजणं थांबवलं. मी जेव्हा एकदा ९५ किलोला स्पर्श केला तेव्हाचं थांबले.' दम लगा के हयशा चित्रपटासाठी भूमीला जाड व्यक्तीची भूमिका साकारायची होती. यासाठी तिला 15 किलो वजन वाढवायचं होतं. यासाठी तिनं आपल्या आहारात मोठा बदल केला. त्यासोबतच तिनं शरीरावर कठोर मेहनतही घेतली. ज्यावेळी तिनं व्यायामाला सुरुवात केली तेव्हा तिचं वजन 72 किलो होतं. या भूमिकेसाठी तिनं आपलं वजन 90 किलो इतकं वाढवलं होतं. प्रियांकानं भूमीचं कौतुक करताना म्हटले, 'तू खूपच अप्रतिम काम केलंस, वजन वगैरे सगळंच छान होतं पण माणूस म्हणून तुझा अभिनयही अप्रतिम होता.'

प्रियाका चोप्रा ही नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर आणि मुंबईतील इतर ठिकाणी 27 ऑक्टोबर-5 नोव्हेंबर दरम्यान पार पडत असलेल्या जिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलची चेअरपर्सन म्हणून देखील काम करते.

प्रियांका गेली वर्षभर रुसो ब्रदर्सच्या 'सिटाडेल' आणि 'लव्ह अगेन' नावाच्या हॉलीवूड प्रकल्पात पुरतं गुंतलेली होती. या चित्रपटात तिचा पती निक जोनासचाही कॅमिओ रोल होता. येत्या काही महिन्यांत ती जॉन सीना आणि इद्रिस एल्बा यांच्यासोबत 'हेड्स ऑफ स्टेट'मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा -

1. Koffee With Karan 8 : 'कॉफी विथ करण'च्या सेटवर बॉबी आणि सनीची धमाल, होणार अनेक रहस्यांचा उलगडा

2. Singham 3 : 'सिंघम 3'मधील रणवीर सिंगचा फर्स्ट लूक रिलीज; सोशल मीडियावर चाहत्यांनी केलं कौतुक...

3. Katrina On Tiger 3 Character : 'स्त्रीसाठी काहीही अशक्य नसतं हे 'टायगर 3' दर्शवतो', 'झोया'च्या पात्राबद्दल कतरिनाचे उद्गार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.