ETV Bharat / entertainment

मालदीवला जाऊन शुटिंग करणं थांबवा, सिनेवर्कर्सचं असोसिएशनचं चित्रपट निर्मात्यांना आवाहन - पंतप्रधान नरेंद्र मोदी

येत्या 15 मार्चपासून भारतीय सैन्य मागे घ्यावे अशी भूमिका मालदीव सरकारनं घेतल्याने सर्वच क्षेत्रांतून संतापाची प्रतिक्रिया येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ऑल इंडिया सिनेवर्कर्स असोसिएशनने (AICWA) चित्रपट उद्योगाला या राष्ट्रापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

Stop shooting in Maldives
मालदीव
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 15, 2024, 10:52 AM IST

नवी दिल्ली : भारतातील चित्रपट निर्मात्यासाठी मालदीव हे चित्रीकरणासाठी अत्यंत आवडते ठिकाण आहे. या ठिकाणाची पर्यटकांनीदेखील भूरळ पडलेली, असते अशी परिस्थिती आहे. परंतु, गेले काही दिवसांपासून चीनच्या आपल्या 'इशाऱ्यावर' भारत आणि मालदीव यांच्यात तणाव होत आहे. हे योग्य नाही अशी प्रतिक्रिया एआयसीडब्ल्यूए (AICWA)चे अध्यक्ष, सुरेश श्यामलाल यांनी दिलीय.

सुट्टीसाठी मालदीवला जाऊ नये : एआयसीडब्ल्यूए (AICWA)चे अध्यक्ष सुरेश श्यामलाल म्हणाले, मालदीव सरकारनं भारत सरकारला 15 मार्चपर्यंत त्यांच्या बेटांवरून भारतीय सैन्य मागे घेण्यास सांगितलय. नुकतेच मालदीवच्या काही मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात चुकीचे शब्द वापरले होते. त्यानंतर, मालदीववर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड भारतात सुरू झाला होता. त्यानंतर भारतीय चित्रपट उद्योगाला आवाहन करतो की, मालदीवमध्ये (चित्रपट) शूट करू नये आणि कोणीही त्यांच्या सुट्टीसाठी मालदीवला जाऊ नये, असंही ते म्हणालेत.

  • #WATCH | Maharashtra | President of All Indian Cine Workers Association (AICWA), Suresh Shyamlal says, "Maldives government has asked the Indian government to withdraw the Indian Army from their islands by March 15. Some days ago, some Maldives ministers had used wrong words… pic.twitter.com/UUAoFY5oSE

    — ANI (@ANI) January 15, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सुंदरतेतही भर पडली : 'एक विलियन', 'मैने प्यार क्यूं किया' सारख्या चित्रपटांमध्ये मालदीवमधील जगाबाहेरची ठिकाणे टॅप केली आहेत. त्यांच्या चित्रिकरणाच्या सुंदरतेतही भर पडली आहे. परंतु, राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांची कट्टरता, कोणताही विवेकपूर्ण विचार भारतीय दिग्दर्शक किंवा निर्मात्याला बेटावर जाण्यास प्रोत्साहित करेल अशी शक्यता नाही, असही ते म्हणालेत.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

नेमकं काय आहे प्रकरण? : 2 जानेवारीला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्षद्वीपला पोहोचले होते. यावेळी त्यांनी सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. त्यामध्ये, ते समुद्रकिनारी फिरताना दिसत आहेत. ही छायाचित्रे आणि व्हिडीओ शेअर करताना पंतप्रधानांनी लक्षद्वीपला भेट देण्याचं भारतीय पर्यटकांना आवाहन केलं. त्यांच्या या आवाहनानंतर मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान मोदी आणि लक्षद्वीपवर वक्तव्य करायला सुरूवात केली. त्यानंतर भारतातील जनतेने आक्षेप घेत मालदीववर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सुरू केल्यावर मालदीवच्या सरकारने टीका करणाऱ्या तीन मंत्र्यांचे राजीनामे घेतले. पण नेमकं त्याचमुळे आता मालदीवची कोंडी होण्याची शक्यता आहे.

दरवर्षी किती भारतीय पर्यटक मालदीवला जातात? या संपूर्ण प्रकरणादरम्यान असा प्रश्न उपस्थित होत आहे की भारतीयांनी बहिष्कार टाकलेल्या मालदीवचा या बेटाच्या अर्थव्यवस्थेवर किती परिणाम होईल? दरवर्षी किती लोक या देशात येतात? मालदीवच्या पर्यटन मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, डिसेंबर 2023 पर्यंत सुमारे 2 लाख 09 हजार 198 भारतीय पर्यटक बेटावर पोहोचले होते. यापूर्वी 2022 मध्ये 2.41 लाख भारतीयांनी मालदीवला भेट दिली होती. 2021 मध्ये 2.91 लाख आणि 2020 मध्ये कोरोना महामारी असूनही 63,000 भारतीयांनी मालदीवला भेट दिली होती.

हेही वाचा :

1 "भारतानं 'या' दिवसापर्यंत आपलं सैन्य घ्यावं मागे", मालदीवचे राष्ट्रपती मुइज्जू यांचा अल्टिमेटम

2 मोदींची एक पोस्ट अन् सगळीकडे लक्षद्वीपचीच हवा! मार्चपर्यंतची सर्व तिकिटं बुक

3 अली मर्चंटनं हनीमूनसाठी मालदीवला जाणं केलं रद्द, गेला 'या' ठिकाणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.