मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने तिच्या नवीन सोशल मीडिया पोस्टने तिच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. मलायकाने तिच्या नवीन पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, ज्यानंतर मलायका आता बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत लवकरच लग्न करणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. मलायका-अर्जुन या लग्नाच्या सीझनमध्ये बोहल्यावर चढणार असल्याचेही बोलले जात आहे. आता मलायकाच्या या पोस्टवरून लवकरच पडदा हटेल आणि तिचं वास्तव समोर येईल याची चाहत्यांनाही प्रतीक्षा आहे. हे दोघे मिळून लवकरच त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर करतील अशी आशा आहे.
मलायका अरोराने 10 नोव्हेंबरला तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये तिने कॅप्शनमध्ये 'मी होय म्हटलं' असे लिहिले आहे. मलायकाने या कॅप्शनसह अनेक गुलाबी हार्ट इमोजी देखील शेअर केले आहेत. आता मलायकाचे चाहते तिचे अभिनंदन करत आहेत आणि लग्नाची तारीख जाहीर करण्याची विनंती करत आहेत. ही पोस्ट शेअर होऊन एक तासही झालेला नाही आणि 1 लाखांहून अधिक चाहत्यांनी ती लाईक केली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
मलायकाच्या या पोस्टमुळे चाहत्यांनी सग्नाच्या या सीझनमध्ये अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा लग्न करून सेटल होणार असल्याची अटकळ बांधायला सुरुवात केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या वर्षाच्या सुरुवातीला अशी चर्चा होती की अर्जुन-मलायका अतिशय साधेपणाने लग्न करणार आहेत आणि बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी पार्टीही आयोजित करणार आहेत.
अर्जुन आणि मलायका यांनी जेव्हापासून त्यांच्या नात्याची माहिती दिली तेव्हापासून ते एकत्र फिरत आहेत आणि त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. पॅरिस आणि लंडनच्या सुट्ट्यांच्या फोटोमध्ये जोडप्याने लक्ष्य सेट करताना उत्कृष्ट फोटो शेअर केले होते. आता चाहते वाट पाहत आहेत की या दोघांच्या लग्नाची अधिकृत घोषणा कधी होते.
हेही वाचा - रणबीर कपूरने आलिया व लेकीसह केला गृहप्रवेश