ETV Bharat / entertainment

Salaar Part 1 Ceasefire : प्रभास स्टारर सलार पार्ट १च्या टीझरने रचला इतिहास, भव्य ट्रेलरचे निर्मात्यांनी दिले वचन - प्रशांत नील दिग्दर्शित सालार पार्ट १

'सालार पार्ट १ सीझफायर' चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टीझर सोडल्यानंतर, निर्मात्यांनी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चच्या अपडेट्सची घोषणा केली आहे. चित्रपटाचा ट्रेलर ऑगस्ट अखेरीस रिलीज होणार असून हा भव्य असेल याची खात्री निर्मात्यांनी दिलीय. या टीझरला रिलीजनंतर २४ तासांत ९० दशलक्षाहून अधिक व्ह्यूज पार झाले आणि यूट्यूबवर १०० दशलक्ष व्ह्यूज ओलांडून एक विक्रम रचला आहे.

Salaar Part 1 Ceasefire
सलार पार्ट १च्या टीझरने रचला इतिहास
author img

By

Published : Jul 8, 2023, 12:46 PM IST

मुंबई - प्रशांत नील दिग्दर्शित सालार पार्ट १ सीझफायर चित्रपटाच्या टीझरचे जबरदस्त स्वागत प्रेक्षकांनी केलंय. टीझरने लॉन्च झाल्यानंतर आधीचे अनेक विक्रम बासनात गेले. टीझर त्याच्या रिलीजनंतर २४ तासांत ९० दशलक्षाहून अधिक व्ह्यूज पार झाले आणि यूट्यूबवर १०० दशलक्ष व्ह्यूज ओलांडले. टीझर लॉन्चला चाहत्यांकडून मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर, सालारच्या निर्मात्यांनी चित्रपट आणि ट्रेलर लॉन्चबद्दल आणखी एक अपडेट शेअर करण्याचा निर्णय घेतला आहे.

इन्स्टाग्रामवर अपडेट शेअर करत निर्मात्यांनी पोस्टला कॅप्शन देताना लिहिलंय, 'सालार १ च्या टीझरला १०० दशलक्ष व्ह्यूज आलेत हे आम्हाला अद्भूत वाटत आहे! या अविश्वसनीय मैलाचा दगड गाठल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. तुमचा पाठिंबा म्हणजे आमच्यासाठीचे विश्व आहे.' त्यांनी अपडेटमध्ये शेअर करताना लिहिलंय, 'आम्ही कृतज्ञतेने भारावून गेलो आहोत! आम्ही चित्रपटाचा सर्वसमावेशक भागीदार म्हणून, तुमच्या प्रत्येकाकडून मिळालेल्या भरभरुन प्रेम आणि समर्थनासाठी आम्ही अत्यंत कृतज्ञ आहोत. हा एक भारतीय सिनेमाचा पराक्रम आहे.'

पुढे त्यांनी म्हटलंय की, '१०० दशलक्ष व्ह्यूजच्या पलीकडे भारतीय चित्रपट सलार टीझरला चालना दिल्याबद्दल आमच्या कमालीच्या चाहत्यांसाठी जोरदार टाळ्या. तुमचा अतुलनीय पाठिंबा आमच्या उत्कटतेला प्रोत्साहन देणारा आहे..' निर्मात्यांनी असेही केलंय की, 'प्रभासची मुख्य भूमिका असलेला सालार पार्ट १-सीझफायरचा ट्रेलर ऑगस्टच्या शेवटी प्रदर्शित होईल आणि भारतीय सिनेमाची भव्यता आपल्याला ट्रेलरमधून दिसेल याचे वचन आम्ही तुम्हाला देत आहोत.'

ऑगस्टच्या अखेरीस तुमचे कॅलेंडरवर नोंद करा की, आम्ही भारतीय सिनेमाची भव्यता दाखविणारा अत्यंत अपेक्षित ट्रेलर प्रदर्शित करण्याची तयारी करत आहोत. अनपेक्षितपणे सज्ज व्हा. भव्यतेचे साक्षीदार होण्यासाठी. आणि अधिक अपडेटसाठी संपर्कात रहा आणि तयार रहा. सर्वांनी मिळून , हा उत्कंठावर्धक प्रवास सुरू ठेवूया, इतिहास रचूया आणि भारतीय सिनेमाच्या सामर्थ्याचा उत्सव साजरा करूया.

होंबळे फिल्म्स द्वारे निर्मित सालार भाग १ -सीझफायरचे दिग्दर्शक म्हणून प्रशांत नील यांनी काम केले आहे आणि यात प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन आणि श्रुती हासन प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट २८ सप्टेंबर रोजी तेलगू, कन्नड, मल्याळम, तमिळ आणि हिंदी भाषांमध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -

१. Chandu Champion : कार्तिक आर्यनच्या स्पोर्ट्स ड्रामा 'चंदू चॅम्पियन'मध्ये श्रद्धा कपूरची एन्ट्री...

२. Spkk Collection Day 9 : 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाच्या कमाईचा वेग मंदावला...३.

३. Marriage Anniversary : रोमँटिक फोटोसह शाहिदने दिल्या पत्नी मीरा राजपूतला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.