ETV Bharat / entertainment

महेश भट्टच्या मिठीत रणबीरला पाहून अनेकांची ह्रदये पाझरली

पूजा भट्टने बहीण आलिया भट्टच्या लग्नानंतर रणबीर कपूर आणि तिचे वडील महेश भट्ट यांच्यात शेअर केलेल्या हृदयस्पर्शी क्षणाची झलक शेअर केली आहे. हा फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला असून वधू पित्याच्या आपल्या मुलीवरील प्रेमाबद्दल चाहते भावूक झाले आहेत.

रणबीर महेश भट्ट भावूक क्षण
रणबीर महेश भट्ट भावूक क्षण
author img

By

Published : Apr 16, 2022, 12:30 PM IST

मुंबई - इतर वडिलांप्रमाणेच ज्येष्ठ चित्रपट निर्माते महेश भट्ट देखील त्यांची मुलगी आलियाच्या लग्नानंतर भावूक झाले. आलियाची सावत्र बहीण पूजा भट्टने शेअर केलेल्या एका नवीन फोटोत विवाहानंतर महेश भट्ट आपला जावई रणबीरला आलिंगन देत असल्याचे दिसत आहे. रणबीर आणि महेश भट्ट यांच्या या फोटोमुळे अनेकांच्या भावना उचंबळल्या आहेत.

लग्नानंतर रणबीर आणि तिच्या वडिलांमध्ये शेअर केलेले हृदयस्पर्शी क्षण पूजाने इन्स्टाग्रामवर शेअर केले. फोटो शेअर करताना पूजाने लिहिले, "जेव्हा मनापासून ऐकण्याची आणि बोलण्याची क्षमता असते तेव्हा कोणाला शब्दांची गरज असते? " वडिलांच्या आपल्या मुलीवरील प्रेमाबद्दल चाहत्यांना भावूक करणारे हे फोटो इंटरनेटवर आधीच व्हायरल झाले आहेत. आलिया आणि रणबीरचे गुरुवारी रणबीरच्या वांद्रे येथील वास्तू या निवासस्थानी झालेल्या एका इंटिमेट सोहळ्यात लग्न झाले.

रणबीर आणि आलियाच्या लग्नातील फोटोंबद्दल चाहते अजूनही उत्सुक आहेत, तर कपूर आणि भट्टांना एका फ्रेममध्ये असलेल्या एका नवीन कौटुंबिक फोटोमुळे सोशल मीडियावर वादळ निर्माण झाले आहे. आलियाची आई सोनी राजदान यांनी शेअर केलेल्या कौटुंबिक फोटोत हे जोडपे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसोबत कॅमेऱ्यासाठी हसत हसत पोज देताना दिसत आहे. कौटुंबिक फोटोमध्ये आलियाची आई सोनी राजदान, वडील महेश भट्ट आणि बहीण शाहीन भट्ट रणबीरसोबत पोज देताना दिसत आहेत, तर रणबीरची आई नीतू कपूर, बहीण रिद्धिमा कपूर साहनी आणि मेहुणा भरत साहनी आलियासोबत पोज देत आहेत.

हेही वाचा - Ranbir Alia Wedding Gift : रणबीर आणि आलियाला मिळाली दोन घोड्यांची अनोखी भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.