मुंबई - vicky kaushal katrina kaif : हिंदी चित्रपटसृष्टीतील पॉवरफुल कपल अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्यासाठी आज 9 डिसेंबर हा खास दिवस आहे. 9 डिसेंबर 2021 रोजी या जोडप्याचं लग्न राजस्थानमधील सवाई माधेपूर येथे झाले होते. आज हे जोडपे त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी या जोडप्याचे कुटुंबीय आणि मित्र त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. विकीचा धाकटा भाऊ सनी कौशलनं भाऊ आणि वहिनीला लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान सोशल मीडियावर चाहत्यांनीही या जोडप्याला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
विकी कौशल आणि कतरिना कैफचा व्हिडिओ झाला व्हायरल : विकी कौशलनं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये विकी आणि कतरिना अंधारात बसलेले दिसत आहेत. व्हिडिओत विकीच्या कानात हेडफोन आहे, तर कतरिना हवेत ठोसे मारताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना विकीनं लिहिलं, ''फ्लाइटमध्ये आणि लाइफमध्ये मनोरंजन! लव्ह यू''. विकीनं शेअर केलेल्या पोस्टवर अनेकजण आता कमेंट करत आहे. एका यूजरनं कमेंट करत या पोस्टवर लिहिलं, ''विकी तू चिंता करू नको कॅट तुझ्यासोबत आहे''. दुसऱ्या एकानं लिहिलं, ''पतीला धमकी देण्याचा हा एक जबरदस्त पर्याय आहे''. आणखी एकानं लिहिलं, '' लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा''. अशा अनेक कमेंट या व्हिडिओवर येत आहेत. याशिवाय काहीजण या व्हिडिओवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.
कतरिना कैफ आणि विकी कौशलचं वर्क्रफंट : कतरिना कैफ शेवटी 'टायगर 3' या चित्रपटात दिसली होती. ती 'चंदू चॅम्पियन', 'मेरी ख्रिसमस' आणि 'जी ले जरा' या चित्रपटामध्ये दिसणार आहेत. दरम्यान, दुसरीकडे विकी त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'सॅम बहादूर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमागिरी करत आहे. याशिवाय तो पुढं 'लुका चुप्पी 2' , 'छावा', 'तख्त' आणि 'डंकी' या चित्रपटामध्ये दिसणार आहेत.
हेही वाचा :