मुंबई - पुष्पा स्टार अल्लू अर्जुनचा मुलगा अल्लू अयान आज आपला वाढदिवस साजरा करत असल्यामुळे अल्लू घराण्यात आनंदाचा प्रसंग आहे. आपल्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अल्लू अर्जुनने सोमवारी सकाळी सोशल मीडियावर अयानला एक सुंदर पोस्ट समर्पित केली. त्याच्या 9 वर्षांच्या मुलावर प्रेमाचा वर्षाव करताना, अल्लु अर्जुनने इंस्टाग्राम स्टोरीजवर एक मनापासून पोस्ट लिहिली आहे.
अल्लु अर्जुनने मुलाच्या वाढदिवसानिमित्य इन्स्टाग्राम स्टेरीवर शेअर केली पोस्ट - त्याच्या मुलाच्या 9व्या वाढदिवशी, अल्लू अर्जुनने आपल्या लहान मुलावर खूप प्रेम असल्याचे सांगितले. अल्लू अर्जुनने एक मोनोक्रोम फोटो टाकला. यामध्ये तो आणि अयान एक सुंदर क्षण शेअर करत आहेत. अयानला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अल्लू अर्जुनने लिहिले: 'माझ्या आयुष्यातील प्रेम, माझ्या सर्वात गोड चिन्नी बाबू अयानला वाढदिवसाच्या शुभेच्छा.'
आई अल्लू स्नेहा रेड्डीनेही लेकाला दिल्या शुभेच्छा - अल्लू अर्जुनने अयानच्या वाढदिवसाची पोस्ट टाकल्यानंतर लगेचच, त्याची पत्नी अल्लू स्नेहा रेड्डी हिने ती पोस्ट तिच्या इंस्टाग्राम हँडलवर रेड हार्ट इमोजीसह पुन्हा शेअर केली. 2011 मध्ये लग्नगाठ बांधलेल्या अर्जुन आणि स्नेहाने तीन वर्षांनंतर अयानचे स्वागत केले होते. अयानची एक धाकटी बहीण अल्लू अर्हा देखील आहे. ती समंथा रुथ प्रभू स्टारर शाकुंतलममधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.
अल्लु अर्जुन पुष्पा 2 सह इतर चित्रपटाच्या शुटिंगमध्ये बिझी - दरम्यान, अल्लू अर्जुन पुष्पा: द रुलच्या कामात गुंतला आहे. अल्लू अर्जुनने गेल्या डिसेंबरमध्ये सुकुमार-दिग्दर्शित पुष्पा 2 चे शूटिंग सुरू केले. पुष्पा: द राइजच्या उत्तुंग यशानंतर, सीक्वलची अपेक्षा शिगेला पोहोचली आहे. अल्लू अर्जुन शिवाय या चित्रपटात रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल देखील चंदन माफियांच्या पार्श्वभूमीवर बेतलेल्या चित्रपटात त्यांच्या भूमिका पुन्हा साकारणार आहेत. अल्लू अर्जुन संदीप रेड्डी वंगा यांच्या आगामी चित्रपटात देखील दिसणार आहे. त्याची निर्मिती टी-सीरीजचे प्रमुख भूषण कुमार करणार आहेत.
हेही वाचा - Raveena Tandon Reached Ujjain : रवीना टंडन पोहोचली उज्जैनला; घेतले महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन