ETV Bharat / entertainment

Leo Box Office Collection Day 3: विजय 'थलपथीच्या 'लिओ'नं बॉक्स ऑफिसवर केलं वादळ निर्माण... - बॉक्स ऑफिस कलेक्शन

Leo Box Office Collection Day 3: विजय 'थलपथीचा 'लिओ' हा 19 ऑक्टोबर रोजी जगभरात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर सर्वात मोठी ओपनिंग केली आहे. रिलीजच्या तिसऱ्या दिवशी हा चित्रपट किती कमाई करेल हे जाणून घेण्यासाठी वाचा...

Leo Box Office Collection Day 3
लिओ बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ३
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 21, 2023, 11:36 AM IST

मुंबई - Leo box office collection day 3 : थलपथी विजयचा 2023 चा मोस्ट अवेटेड चित्रपट 'लिओ' 19 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या दोन दिवसांतच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. विशेषत: तमिळ आणि तेलुगू भाषिक राज्यांमध्ये या चित्रपटानं जोरदार कमाई केली आहे. लोकेश कनगराज दिग्दर्शित 'लिओ'नं दोन दिवसांत 100 कोटींहून अधिक कमाई करून इतिहास रचला आहे. हा चित्रपट रिलीजच्या तिसऱ्या दिवसात आहे. रिलीजच्या तिसऱ्या दिवशी 'लिओ' बॉक्स ऑफिसवर किती कमाई करेल हे जाणून घेऊया...

'लिओ' तिसऱ्या दिवशी किती कमाई करेल : 'लिओ'नं रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर, या चित्रपटानं देशांतर्गत 64.8 कोटी रुपयांची तुफानी ओपनिंग केली होती. आता रिलीजच्या दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 36.88 कोटीची कमाई केली आहे. यासह या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 100.80 कोटी झाले आहेत. हा चित्रपट रिलीजच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी 38.73 कोटी कमाई करू शकते. यासह या चित्रपटाचं एकूण कलेक्शन हे 140.41 कोटी रु. होईल.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'लिओ'चा सुट्ट्यांच्या दिवशी होणार फायदा : आगामी सुट्ट्यांचा पुरेपूर फायदा 'लिओ'ला मिळेल. या चित्रपटासाठी शनिवार आणि रविवार खूप मोठा असणार आहे, तर सोमवारी महानवमीच्या सुट्टीत आणि त्यानंतर मंगळवारी दसऱ्याच्या दिवशी या चित्रपटाचे मोठे कलेक्शन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बुधवारपर्यंत हा चित्रपट 300 ते 400 कोटींचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. 'लिओ' चित्रपटानं याआधीच जगभरातील बॉक्स ऑफिसवर सर्वात मोठ्या तमिळ ओपनरचा विक्रम केला आहे. 'लिओ' हा लवकरच '2.0', 'पोनियिन सेल्व्हल-1' आणि 'जेलर'च्या कलेक्शनला मागे टाकू शकतो. सध्या 'लिओ'च्या बॉक्स ऑफिस रिपोर्टवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

हेही वाचा :

  1. Suhana Khans song Sunoh : सुहाना खानच्या 'सुनोह' गाण्यातून शाहरुख खानला मिळाला 'प्रेरणा'चा डोस
  2. Tiger Shroff visited Siddhivinayak : 'गणपथ' चित्रपट रिलीजनंतर टायगर श्रॉफ सिद्धीविनायकाच्या चरणी लीन
  3. Bigg Boss 17: 'वीकेंड का वार'च्या बिग बॉसमध्ये आधी राडा, नील भट्ट-विकी जैन, अंकिता लोखंडे-खानजादी एकमेकांशी भिडले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.