ETV Bharat / entertainment

Rhea Chakraborty : सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीनं व्हिडिओ पोस्ट करून शेअर केला तुरुंगातील अनुभव... - रिया चक्रवर्ती शेअर केला व्हिडिओ

Rhea Chakraborty : दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर, त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर अनेक गंभीर आरोप झाले. त्यानंतर तिला तुरुंगवास देखील भोगावा लागला होता. दरम्यान आता तिनं एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिनं तुरुंगामधीलचा अनुभव सांगितला आहे.

Rhea Chakraborty
रिया चक्रवर्ती
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 26, 2023, 5:29 PM IST

मुंबई - Rhea Chakraborty : हिंदी चित्रपटसृष्टीतील दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर, त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. दरम्यान तिनं तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट टप्प्यातील अनुभव सर्वांसोबत शेअर केला. रियानं सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तिनं तिच्या तुरुंगामधील दिवसांचा उल्लेख केला आहे. तिनं व्हिडिओमध्ये सांगितले की, तुरुंगात राहणे माझ्यासाठी खूप भीतीदायक होते, पण मला असे काही लोक भेटले होते, ज्यांच्याकडून मला प्रेम मिळाले.

रिया चक्रवर्तीनं तुरुंगातील अनुभवबद्दल सांगितला : हा व्हिडिओ रिया चक्रवर्तीनं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, जेव्हा रियाला विचारण्यात आले की, तिचा तुरुंगातील अनुभव कसा होता. यावर ती म्हणते की 'जेल ही अशी जागा आहे जिथे तुम्हाला समाजातून काढून टाकले जाते आणि एक नंबर दिला जातो'. रिया पुढं म्हटलं, 'जेव्हा मी तुरुंगात गेले तेव्हा, मी अंडर-ट्रायल कैदी होते आणि माझ्यासारख्या अनेक महिला होत्या ज्यांना शिक्षाही मिळायची होती. या महिलांना पाहून आणि बोलून मला एका वेगळ्या प्रेमाची अनुभूती झाली, कारण त्या महिला छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधत होत्या. होय, कधी कधी त्याची भाषा मला विचित्र वाटायची, पण त्यांना पाहिल्यानंतर जीवन स्वर्ग किंवा नरक बनवणे ही फक्त तुमची निवड आहे. परिस्थिती कशीही असो, कधीकधी ही लढाई लढणे कठीण होते. जर तुमच्यात ताकद असेल तर सर्वकाही सोपे होते'.

रियानं तुरुंगात केला होता डान्स : यापूर्वी तुरुंगाबद्दल बोलताना रिया सांगितलं होत की, मी तुरुंगात सर्वांना वचन दिले होते की, मला जामीन मिळाल्यावर मी नागिन डान्स करेन. जेव्हा मला बेल मिळाली तेव्हा, मी तिथल्या महिलांसोबत जमिनीवर झोपून नागिन डान्स केला होता. दिवंगत सुशांत सिंग राजपूत 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या अपार्टमेंटमध्ये मृत अवस्थेत सापडला होता. ही बातमी ऐकल्यानंतर अनेकांना धक्का बसला होता. सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर अनेकजण सोशल मीडियाद्वारे त्याच्याविषयी पोस्ट शेअर करत न्यायाची मागणी करत असतात. त्याचे निधन होऊन 3 वर्ष झाली आहे, मात्र तरीही सुशांतचे चाहते त्याला विसरू शकले नाही.

हेही वाचा :

  1. Kangana Ranaut : कंगना राणौतनं 'तेजस' रिलीजपूर्वी घेतलं रामलल्लाचं दर्शन
  2. Kapil Sharma Ad : जाहिरातीत कपिल शर्मानं केलं अक्षय कुमारला रिप्लेस; व्हिडिओ केला शेअर...
  3. Rajkumar Rao became national icon : राजकुमार राव बनला निवडणूक आयोगाचा नॅशनल आयकॉन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.