ETV Bharat / entertainment

सोनाली फोगटची शेवटची इन्स्टा पोस्ट पाहून चाहत्यांना अश्रू अनावर - सोनाली फोगटची अखेरची इन्स्टाग्राम पोस्ट

अभिनेत्री सोनाली फोगटच्या निधनापूर्वी तिने पोस्ट केलेला अखेरचा व्हिडिओ लोकांच्या डोळ्यात अश्रू आणत आहेत. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने उत्साही असलेल्या या व्हिडिओवर लोक कमेंट करत असतानाच आता चाहत्यांवर तिच्यासाठी श्रध्दांजली वाहण्याचा प्रसंग ओढवला आहे.

अभिनेत्री सोनाली फोगट
अभिनेत्री सोनाली फोगट
author img

By

Published : Aug 23, 2022, 1:30 PM IST

Updated : Aug 23, 2022, 1:50 PM IST

मुंबई - भाजप नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगटच्या निधनाने मनोरंजन आणि राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. सोनालीचा चाहता वर्ग खूप मोठा होता. तिच्या सोशल मीडियावरुन ती चाहत्यांच्या नेहमी संपर्कात राहून संवाद साधण्याचा प्रयत्न करीत असे. तिच्या मृत्यूनंतर तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेली अखेरची पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. तिच्या मृत्यूच्या काही तास आधी सोनाली फोगटने इन्स्टाग्रामवर ही पोस्ट केली होती

तिच्या आकस्मिक निधनाच्या काही तास आधी, सोनाली फोगटने इन्स्टाग्रामवर स्वतःचे काही फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले होते. फोटोमध्ये ती गुलाबी फेट्यामध्ये दिसत आहे. सोनाली फोगटची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट चाहत्यांचे डोळे ओले करणारी आहे, कारण ती कृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवातील फोटो आणि व्हिडिओंमध्ये खूप उत्साहाने भरलेली दिसत आहे. तिच्या चाहत्यांनी हार्ट इमोजीसह कमेंट सेक्शन भरला आहे आणि आता चाहते शोक संदेश पाठवत आहेत.

2016 मध्ये सोनाली फोगटने अम्मा: एक माँ जो लाखों के लिए बनी अम्मा या टीव्ही शोमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 2019 मधील द स्टोरी ऑफ बदमाशगड या वेब सीरिजचाही ती एक भाग होती. TikTok वरील तिच्या व्हिडिओंमुळे ती प्रसिद्ध झाली होती. सोनाली फोगट 2020 मध्ये बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्येही दिसली होती.

सोनाली फोगट, मूळची हरियाणाची, हिने हरियाणातून मागील विधानसभा निवडणूक आदमपूर मतदारसंघातून कुलदीप बिश्नोई यांच्या विरोधात भाजपच्या तिकिटावर लढवली होती. 2019 मध्ये भाजपमध्ये सामील झालेला माजी टिकटॉक स्टार फोगट तिच्या काही स्टाफ सदस्यांसह गोव्याच्या दौऱ्यावर होती.

अभिनेत्री सोनाली फोगट
अभिनेत्री सोनाली फोगट

सोमवारी रात्री तिला अस्वस्थतेची तक्रार केल्यानंतर उत्तर गोवा जिल्ह्यातील अंजुना येथील सेंट अँथनी रुग्णालयात आणण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

अभिनेत्री सोनाली फोगट
अभिनेत्री सोनाली फोगट

प्राथमिकदृष्ट्या, मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सिद्ध झाले आहे, परंतु पुढील वैद्यकीय तपासणी सुरू आहे. बांबोलीम येथील सरकारी गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात शवविच्छेदन केले जाईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा - वाईल्ड कार्डद्वारे शोमध्ये प्रवेश करत लोकप्रिय झाली होती सोनाली

Last Updated : Aug 23, 2022, 1:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.