ETV Bharat / entertainment

रजनीकांत स्टारर 'लाल सलाम'मधील पहिलं धमाल गाणं लॉन्च - Lal Salaam directed by Aishwarya Rajinikanth

first song from the movie Lal Salaam : रजनीकांत स्टारर 'लाल सलाम' या चित्रपटाबाबतचा उत्साह वाढत असताना निर्मात्यांनी चित्रपटातील थेर थिरुविझा हे पहिलं गाणं रिलीज केलंय. ऐश्वर्या रजनीकांत दिग्दर्शित हा चित्रपट 2024 मध्ये पोंगलला रिलीज होणार आहे.

first song from the movie Lal Salaam
'लाल सलाम'मधील पहिलं धमाल गाणं लॉन्च
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 18, 2023, 7:58 PM IST

मुंबई - first song from the movie Lal Salaam : 'लाल सलाम' हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज होत असताना निर्मात्यांनी यातील पहिले गाणे लॉन्च केलं आहे. रिलीजची तारीख जवळ येत असताना चित्रपटाबद्दलची उत्सुकता ताणली गेली आहे. अशातच एक धमाल उत्सवी, भरपूर ऊर्जा देणारं 'थेर तिरुविझा' हे गाणं लॉन्च करण्यात आलंय. हा चित्रपट जानेवरी महिन्याच्या सुरुवातीला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ऐश्वर्या रजनीकांत दिग्दर्शित 'लाल सलाम' हा 2024 मधील पोंगल शर्यतीचा भाग असणार्‍या असंख्य चित्रपटांपैकी एक आहे. विष्णू विशाल आणि रजनीकांत यांच्या भूमिका असलेल्या 'लाल सलाम' मधील पहिल्या गाण्यानं धमाल उडवली आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'लाल सलाम'च्या रिलीजला फक्त एक महिना उरला असताना चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्याची प्रचार मोहीम सुरू केली आहे. सोमवारी चित्रपटातील पहिले गाणे उघड करण्यात आलं. थेर तिरुविझा नावाचे हे पहिले गाणे सोमवारी सायंकाळी लॉन्च करण्यात आले. या गाण्याला ए आर रहमानचे संगीत आहे. रजनीच्या चाहत्यांना 'लाल सलाम'कडून खूप आशा आहेत कारण रजनीकांतने एका प्रदीर्घ विश्रांतीनंतर मुस्लिम पात्राची भूमिका साकारली आहे.

रजनीकांतची मोठी मुलगी ऐश्वर्या हिने '3' मधून दिग्दर्शनात पदार्पण केले होते. आता या प्रतिभावान दिग्दर्शिकेनं विस्तारित कॅमिओमध्ये रजनीकांतसोबत स्पोर्ट्स ड्रामा सादर केला आहे. लायका प्रॉडक्शनने हा चित्रपट बँकरोल केला आहे. क्रिकेटवर आधारित 'लाल सलाम' या चित्रपटातील मुख्य कलाकारांमध्ये विक्रांत आणि विष्णू विशाल यांचा समावेश आहे. 'लाल सलाम'चे चित्रीकरण पूर्ण झाले असून हा चित्रपट पोंगल सणादरम्यान जानेवारीमध्ये प्रदर्शित होणार आहे.

क्रिकेट खेळाडू आणि अभिनेता विष्णू विशाल आणि विक्रांत मुख्य भूमिकेत आहेत. लाल सलाममध्ये मोईदीन भाईच्या रूपात रजनीकांत कॅमिओमध्ये झळकणार आहे. विक्रांतच्या पात्राचे नाव माहित नसले तरी, विष्णू कुशाल चित्रपटात थिरुनावुकारासूची भूमिका साकारणार आहे.

हेही वाचा -

1. जेठालाल उर्फ दिलीप जोशी यांच्या मुलाच्या लग्नात 'तारक मेहता'च्या कलाकारांनी लावली हजेरी

2. प्रभासच्या भव्य अ‍ॅक्शनचा सनसनाटी थरार असलेला 'सालार'चा ट्रेलर लॉन्च

3. विकी कौशल स्टारर 'सॅम बहादूर'नं 100 कोटींचा टप्पा केला पार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.