ETV Bharat / entertainment

Koffee With Karan: शुभमन गिलशी डेटिंगच्या प्रश्नावर सारा अली खाननं पहिल्यांदाचं सोडलं मौन - सारा अली खान

करण जोहरच्या सोमध्ये कॉफी पिण्यासाठी बॉलिवूड सुंदरी सारा अली खान आणि अनन्या पांडे सोफ्यावर पोहोचल्या आहेत. शोच्या लेटेस्ट प्रोमोमध्ये सारा क्रिकेटर शुभमन गिलसोबत डेटिंगच्या चर्चेवर भाष्य करताना दिसतेय.

Koffee With Karan
सारा अली खाननं पहिल्यांदाचं सोडलं मौन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 6, 2023, 5:14 PM IST

मुंबई - Koffee With Karan : अभिनेत्री सारा अली खान आणि अनन्या पांडे करण जोहरचा चॅट शो 'कॉफी विथ करण'मध्ये अवतरल्या आणि त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींवर भाष्य केलं. सारा अलीचं नाव बऱ्याच दिवसापासून भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा फलंदाज शुभमन गिलसोबत जोडलं जात आहे. दोघांना डिनर डेटवर एकत्र पाहल्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपबद्दलच्या चर्चांना उधाण आलं.

सारा अली खान आणि अनन्या पांडे या दोघींनीही कधीच या विषयावर थेट भाष्य केलं नाही किंवा त्यांनी कधीही अधिकृतपणे त्यांच्या अफेअरच्या दाव्यांकडे लक्ष दिले नाही. असं असलं तरी सारा आता पहिल्यांदाच तिच्या कथित नातेसंबंधाबद्दल बोलली आहे. 'कॉफी विथ करण'च्या आगामी भागाच्या लेटेस्ट प्रिव्ह्यूमध्ये करण जोहरने साराला शुभमनसोबतच्या तिच्या नातेसंबंधाच्या चर्चेबद्दल विचारले तेव्हा सारा म्हणाली, 'सगळं जग चुकीच्या साराला शोधतंय. ( सारा का सारा दुनिया गलत सारा के पिछे पडा है. )

वेगवेगळ्या मीडियाच्या दाव्यानुसार सारा तेंडूलकरला शुभमन डेट करतोय. त्यामुळे तो नेमक्या कोणत्या साराला डेट करतोय यावर चर्चा झडल्या होत्या. यावरुन पूर्वी एकदा साराला विचारण्यात आलं होतं की तुझी आजी शर्मिला टागोर प्रमाणे ती क्रिकेटरशी लग्न करेल का, त्यावर सारा म्हणाली होती की, 'तो काय करतो यामुळे तिला काही फरक पडत नाही. तो क्रिकेटर आणि की व्यापारी आहे यापेक्षा तो माणूस म्हणून तिच्याशी मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सुसंगत असणं अधिक महत्त्वाचं आहे.'

'मी ज्या प्रकारची व्यक्ती आहे त्यावरुन मला विश्वास आहे की मी अ‍ॅक्टर, डॉक्टर, क्रिकेटर, बिझनेसमन अशा कोणालाही शोधू शकते, पण दुसऱ्या बाजूला ते पळूनही जातील. विनोद बाजूला राहू दे, पण तुम्हाला हे माहितीय की, माझ्याशी मानसिक आणि बौद्धिक स्तरावर जुळवून घेणे आवश्यक आहे. तुम्हाला जर ते जमलं तर ते भारी असेल, पण ते काय करतात याहून हे अधिक महत्त्वाचं असेल.', असं सारा अली खान म्हणाली.

'कॉफी विथ करण सीझन 8' बद्दल बोलायचं तर याच्या टीझरमध्ये करण जोहर दोघींना त्यांच्या माजी प्रियकराबद्दलचा प्रश्न विचारतो. 'ही शोची जबरदस्त सुरुवात असेल', असे सारा म्हणते. शुभमन गिलसोबत डेटिंग करत असल्याच्या दाव्याचं यावेळी सारा अलीनं खंडन केलं. अनन्या आणि विजय देवराकोंडा याच्यात काही नातं होतं याला अनन्या पंडेनंही नकार दिला. 'लायगर' चित्रपटासाठी आणि अनन्या एकत्र आले होते.

'कॉफी विथ करण'च्या प्रोमोत आपल्याला रॅपिड फायर राऊंड पाहायला मिळतो. या करण साराला विचारतो, 'आम्हाला एक गोष्ट सांगा जी अनन्याकडे आहे आणि तुझ्याकडे नाही.' सारा लगेच उत्तर देते, 'ए नाईट मॅनेजर', आदित्य रॉय कपूर- अनन्या पांडे यांच्यात असलेल्या कथित रोमान्सच्या संदर्भात सारानं हे वाक्य उच्चारलं. शोच्या तिसर्‍या एपिसोडसाठी दोघीही करणसोबत सामील होणार असल्यानं हा एपिसोड मजेदार असणार आहे. 'कॉफी विथ करण सीझन 8' चा नवीन भाग गुरुवारी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रसारित होईल.

हेही वाचा -

1. Kh 234: कमल हसन आणि दुलकर सलमानचं 'केएच 234' चित्रपटातील फर्स्ट लूक रिलीज

2. Tara Sutaria : तारा सुतारियानं एक आठवडा टाळली होती आंघोळ, 'अपूर्वा'साठी अनोखं समर्पण

3. The Railway Men Trailer Release : भोपाळ गॅस दुर्घटनाचा जीवघेणा थरार, 'द रेल्वे मेन'चा ट्रेलर प्रदर्शित

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.