ETV Bharat / entertainment

'कॉफी विथ करण सीझन 8'च्या शोमध्ये दिसणार कियारा अडवाणी आणि विकी कौशल; प्रोमो प्रदर्शित - कॉफी विथ करणचा नवीन प्रोमो

koffee With Karan 8 New Promo: करण जोहरचा टॉक शो 'कॉफी विथ करण' सीझन 8मध्ये विकी कौशल आणि कियारा अडवाणी हजेरी लावणार आहेत. या शोचा आता प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे.

koffee With Karan 8 New Promo
कॉफी विथ करण सीझन 8चा नवीन प्रोमो
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 4, 2023, 3:58 PM IST

मुंबई - koffee With Karan 8 New Promo: करण जोहरचा लोकप्रिय टॉक शो 'कॉफी विथ करण'चा प्रत्येक सीझन खूप खास असतो. 'कॉफी विथ करण'चा सीझन 8 खूप सध्या चर्चेत आहे. या शोच्या नव्या एपिसोडचा एक प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. नव्या एपिसोडमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील सिद्धार्थ मल्होत्राची पत्नी अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सॅम बहादूर स्टार विकी कौशल येणार आहेत. करण जोहर या एपिसोडमध्ये अनेक गुपिते उघडणार आहेत. 'कॉफी विथ करण 8' या शोचा नवा प्रोमो रिलीज झाल्यानंतर अनेकांनी यावर कमेंट करत कियारा आणि विकीचे कौतुक केले आहेत.

'कॉफी विथ करण 8' प्रोमो झाला रिलीज : करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 8' या शोच्या नवीन प्रोमोमधील कियारा अडवाणी आणि विकी कौशलचा लूक खूप सुंदर आहे. चाहते त्याच्या लूकमुळं प्रभावित झाले आहे. कियारानं या शोमध्ये डीप ऑफ शोल्डर ब्लॅक गाऊन परिधान केला आहे. याशिवाय तिनं लाईट मेकअप केला असून यावर केस मोकळे सोडले आहेत. या लूकमध्ये ती खूप खास दिसत आहे. दुसरीकडे विकी कौशलनं ब्लॅक सुट घातला आहे. या एपिसोडमध्ये दोघांनी धम्माल उडवून दिली आहे. प्रसिद्ध झालेल्या प्रोमोमध्ये करण जोहर त्याचे पाहुणे कियारा आणि विकीला मजेशीर प्रश्न विचारताना दिसतो. यावर या दोघांनी चांगली उत्तरंही दिली आहे.

कियारानं केला सिद्धार्थबद्दल खुलासा : करण जोहरनं प्रोमोच्या सुरुवातील दोन्ही स्टार्सची ओळख करून दिली आहे. यानंतर विकी कौशल थेट करणवर हल्ला करत म्हणतो की, ''आम्ही इथे स्वतःला शुद्ध करण्यासाठी आलो आहोत.'' यानंतर करण म्हणतो की, ''गेल्या वेळी मी विकीची मुलाखत घेतली होती, तेव्हा कियारा तुझा पती याच्यासोबत आला होता''. यानंतर कियारा सांगते की, 'जेव्हा आम्ही रोमहून आलो होतो आणि सिद्धार्थ विकीसोबत या शोचा भाग होणार होता, त्याआधीच त्यानं मला प्रपोज केलं होतं.'' कियाराचे हे शब्द ऐकून करण आणि विकी आश्चर्यचकित होतात. विकी म्हणतो की, ''कियारा खूप छान खेळते.'' याशिवाय विकीनं कतरिनाशी संबंधित अनेक किस्सेही शेअर केले. विकी कतरिनाला कोणत्या नावानं हाक मारतो असं करणनं विचारलं तेव्हा यावर त्यानं सांगितलं की, ''बुबू, बेबी, ये''. ही नावं ऐकून करण आणि कियारा जोरजोरात हसायला लागतात. यानंतर कियारानं सांगितलं की, ती आणि सिद्धार्थ दोघेही एकमेकांना माकड म्हणतात.

हेही वाचा :

  1. रणदीप हुड्डा आणि लिन लैशराम यांचं रिसेप्शन होणार 'या' दिवशी
  2. भारतीय नौदलानं दिली छत्रपती शिवाजी महाराजांना वंदना, बिग बीच्या आवाजातील व्हिडिओ केला शेअर
  3. सलमान खानचा 'टायगर 3' 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.