ETV Bharat / entertainment

KKBKKJ song Yentamma out: सलमान खान आणि व्यंकटेश दग्गुबती यांच्यासोबत यंतम्मा गाण्यावर थिरकला राम चरण - Ram Charan

'किसी का भाई किसी की जान' या गाण्यात 'दिग्गज' सलमान खान आणि व्यंकटेश दग्गुबती यांच्यासोबत स्क्रीन शेअर केल्याबद्दल राम चरण खूश झाला आहे. निर्मात्यांनी मंगळवारी यंतम्मा हे नवे गाणे लॉन्च केले.

किसी का भाई किसी की जानमधील यंतम्मा गाणे रिलीज

author img

By

Published : Apr 4, 2023, 5:02 PM IST

मुंबई - आगामी कौटुंबिक मनोरंजनात्मक चित्रपट किसी का भाई किसी की जानच्या निर्मात्यांनी मंगळवारी चित्रपटातील यंतम्मा या नवीन गाण्याचे लॉन्चिंग केले. या गाण्यात विशेष भूमिका साकारणारा अभिनेता राम चरणने हे गाणे इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. सलमान खान पहिल्यांदाच आरआरआर स्टार राम चरण आणि लिजेंड अभिनेता व्यंकटेश दग्गुबती यांच्यासोबत थिरकताना दिसला आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

यंतम्मामध्ये राम चरणची धमाकेदार एन्ट्री - यंतम्मा गाण्यात, सलमान वेंकटेशसोबत लुंगीसह चमकदार पिवळा शर्ट घातलेला दिसत आहे. या हगाण्याच्या शेवटी, राम चरण डान्स फ्लोअरवर सलमान आणि व्यंकटेशसोबत सामील होतो. विशाल ददलानी आणि पायल देव यांनी गायलेले हे गाणे शब्बीर अहमद यांनी लिहिले आहे. गाण्याची संपूर्ण आवृत्ती ४ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित करण्यात आली आहे. साऊथ आणि बॉलिवूड यांचे नाते खूप जुने आहे. अनेक साथ स्टार्सनी हिंदीमध्ये निशाब आजमावले आहे. पॅन इंडिया चित्रपट जेव्हा साऊथमध्ये बनतात तेव्हा बॉलिवूड स्टार्स त्यात नक्की भाव खाऊन जातात. आता गंगा उलट वाहात असून बॉलिवूडमध्ये साऊथ स्टार्स कॅमिओ करत आहेत.

राम चरणच्या इन्स्टाग्रामवर प्रतिक्रियांचा पाऊस - इंस्टाग्रामवर गाणे शेअर करताना राम चरणने लिहिले, 'माझ्या सर्वात मौल्यवान ऑन-स्क्रीन क्षणांपैकी एक. लव्ह यू भाई. या परिपूर्ण दिग्गजांसह नाचत आहे...यंतम्मा गाणे आता आऊट झाले आहे.' त्याने पोस्ट शेअर केल्यानंतर लगेचच, चाहत्यांनी पेप्पी नंबरचे कौतुक करत कमेंट विभागात झुंबड उडवली. गाण्यावर प्रतिक्रिया देताना, एका चाहत्याने लिहिले, 'मास भाईला भेटते' तर दुसर्‍याने म्हटले, 'तुला सलमानसोबत डान्स करताना पाहणे आनंददायी आहे.'

किसी का भाई किसी की जान ईदला प्रदर्शित होणार - सलमान खान फिल्म्स प्रोडक्शन अंतर्गत बनवलेल्या, किसी का भाई किसी की जान चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी करत आहेत. या चित्रपटात पूजा हेगडे, जगपती बाबू आणि भूमिका चावला यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. आगामी अ‍ॅक्शन ड्रामामधून शहनाज गिल आणि पलक तिवारी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. किसी का भाई किसी की जान हा चित्रपट 2023 च्या ईदला थिएटरमध्ये येत आहे.

हेही वाचा - Tamannaah Bhatia Nickname : विजय वर्माने कथित गर्लफ्रेंडसाठी ठेवलेले टोपणनाव वाचून चाहत्यांची बत्ती गुल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.