ETV Bharat / entertainment

Kirti Mehra in Bigg Boss 17 : एल्विश यादवची कथित गर्लफ्रेंड कीर्ती मेहरा बिग बॉस 17 मध्ये होणार सहभागी? - बिग बॉस 17 मध्ये एल्विश यादव

Kirti Mehra in Bigg Boss 17 : सलमान खान-होस्ट करत असलेल्या बिग बॉसच्या 17 व्या सिझनमध्ये किर्ती मेहरा सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा इंटरनेटवर आहे. बिग बॉस विजेता एल्विश यादवची ती कथित गर्लफ्रेंड असल्याचं बोललं जातंय.

Kirti Mehra in Bigg Boss 17
बिग बॉसच्या 17 व्या सिझनमध्ये किर्ती मेहरा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 9, 2023, 3:41 PM IST

मुंबई - Kirti Mehra in Bigg Boss 17 : बिग बॉस 17 मध्ये एल्विश यादवची कथित गर्लफ्रेंड कीर्ती मेहरा स्पर्धक म्हणून भाग घेणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, कीर्तीनं यासंबंधीच्या बातम्यांच्याकडं सूचक इशारा केला आहे. काही लोकांनाच याची कल्पना आहे पण लवकरच सर्वांना याबद्दल कळेल, असे तिनं म्हटलंय. किर्तीच्या आयुष्यात काही तरी मोठी घडामोड घडणार असल्याचं या व्हिडिओत बोललं जातंय आणि याचा उलगडा 17 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

बिग बॉस 17 मध्ये किर्ती सहभागी होणार असल्याचं तिनं नकळत सांगितल्यामुळे सोशल मीडियावर याबाबत तर्क केले जात आहेत. काहींना वाटतंय की या सिझनमध्ये किर्ती मेहरा बाजी मारुन जाणार. ती मजबूत स्पर्धक म्हणून या सीझनमध्ये आपले वर्चस्व निर्माण केरल, असा अनेक युजर्सनी दावा केला आहे. दरम्यान, किर्ती आणि एल्विश हे डेटिंग करत होते का याबद्दलचा शंकाही काही नेटिझन्सनी व्यक्त केल्या आहेत. कारण बिग बॉस विजेत्या एल्विशने आतापर्यंत कधीच किर्तीच्या नावाचा उल्लेख केलेला नाही.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

विशेष म्हणजे, एल्विश यादवने यापूर्वी बिग बॉस 17 मध्ये सहभागी होण्यामध्ये रस नसल्यांच म्हटलं होतं. नंतर जेव्हा तो विजेता झाला तेव्हा त्याच्यावर टीकेची झोडही उठवण्यात आली, त्याचा द्वेष काहीजण करत होते, तर काहींनी त्याच्याबाबत नकारात्मक कमेंट्सही करत ट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यानं बिग बॉस ओटीटी सीझन 2 ट्रॉफी परत करण्याचा विचार केला होता. किर्ती आणि एल्विश ही जोडी माजी लव्हबर्ड्स असल्याचं काहीजण म्हणतात. बिग बॉसमध्ये असलेल्या खडतर आव्हानांचा मुकाबला ती कशी करु शकेल हे पाहणे रंजक ठरेल.

याआधी 90 च्या दशकातील बोल्ड अभिनेत्री ममता कुलकर्णीला देखील सलमान खान होस्ट केलेल्या रिआलिटी शोमध्ये भाग घेण्यासाठी संपर्क साधण्यात आला असल्याच्या बातम्या झळकल्या होत्या. नेमके या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून कोण असणार याची स्पष्टता 17 ऑक्टोबर रोजीच येणार आहे. बिग बॉस 17 चा प्रीमियर रविवारी 15 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजता होणार आहे.

हेही वाचा -

1. Akshay Kumar :ट्रोल झालेल्या अक्षय कुमारनं तोडला पान मसाला कंपनीचा करार

2. Dhak Dhak trailer out: 'धक धक'चा कडक ट्रेलर रिलीज, महिलांचं जीवन बदलणारा प्रवास सुरू

3. Amazon and Flipkart Big Sale 2023 :ऑनलाईन शॉपिंगवर अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टसह इतर साइटस् देणार 'इतकी' सूट ; महाऑफर सुरू...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.