ETV Bharat / entertainment

KBC 14: शोमध्ये जया बच्चनच्या प्रश्नानंतर बिग बींच्या डोळ्यात दाटले अश्रू - केबीसीमध्ये अमिताभ बच्चन रडले

कौन बनेगा करोडपती 14 च्या लेटेस्ट प्रोमोमध्ये असे दाखवण्यात आले आहे की संभाषणादरम्यान जया बच्चन असे काहीतरी बोलतात की ज्यामुळे अमिताभच्या डोळ्यात अश्रू जमा होतात आणि बच्चन टिश्यू पेपरने अश्रू पुसताना दिसतात.

बिग बींच्या डोळ्यात दाटले अश्रू
बिग बींच्या डोळ्यात दाटले अश्रू
author img

By

Published : Oct 10, 2022, 12:24 PM IST

मुंबई - बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन 11 ऑक्टोबर रोजी 80 वर्षांचे होत आहेत. त्यांच्या वाढदिवसाचा विशेष भाग कौन बनेगा करोडपती 14 च्या सेटवर साजरा करण्यात आला. यावेळी हॉट सिटवर त्यांची पत्नी जया बच्चन आणि मुलगा अभिषेक बच्चन उपस्थित होते.

जया व अभिषेक यांनी हॉट सीटवरुन होस्टसोबत काही मनोरंजक गप्पा मारताना भूतकाळातील काही आठवणी जागवल्या. शोचा प्रोमो रिलीज झाला असून यात शोची सुरुवात अभिषेकच्या एंट्रीने झाली आणि नंतर हॉट सीट घेतल्यानंतर तो जयाचे स्वागत करताना म्हणतो, "रिश्ते मे जो हमारी माँ लगती हैं.''. त्यानंतर जया पांढर्‍या नक्षीचा सूट घालून शोमध्ये प्रवेश करतात. याक्षणी बिग बी भावूक झालेले दिसले.

लेटेस्ट प्रोमोमध्ये असे दाखवण्यात आले आहे की संभाषणादरम्यान जया बच्चन असे काहीतरी बोलतात की ज्यामुळे अमिताभच्या डोळ्यात अश्रू जमा होतात आणि बच्चन टिश्यू पेपरने अश्रू पुसताना दिसतात.

बिग बीच्या वाढदिवसाच्या स्पेशल एपिसोडमध्ये जया बच्चन आपल्या पतीला विचारताना दिसतात की, "जर टाईम मशीन असते, तर तुम्हाला कोणत्या वर्षी परत जायला आवडेल आणि का?" ज्याला बिग बी उत्तर देतात, "मला परत जायला आवडेल..." असे अमिताभ म्हणत असताना स्क्रिनवर त्यांचे अलाहाबादमधील वडिलोपार्जित घर दिसते, जिथे त्यांनी आपले बालपण घालवले होते. बालपणीचे दिवस आठवताना अभिनेता बिग बी भावूक होतो आणि रडतो. KBC 14 सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होत आहे.

हेही वाचा - Amitabh Bachchan Photo : अमिताभ बच्चन यांचा 80 वा वाढदिवस; पाहा, लहानपणापासूनचे फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.