मुंबई - katrina kaif : अभिनेत्री कतरिना कैफ सध्या तिच्या आगामी चित्रपट 'मेरी ख्रिसमस'मुळं चर्चेत आहे. तिचा हा चित्रपट 2024 रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. कतरिनाचा 'मेरी ख्रिसमस' हा डिसेंबर 2023 मध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु अनेक वेळा तारीख बदलल्यानंतर शेवटी हा चित्रपट 12 जानेवारी 2024 रुपेरी पडद्यावर दाखल होत आहे. कतरिना कैफ आता या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतली आहे. कतरिनाने एका मुलाखती दरम्यान तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल सांगितलं. 'मेरी ख्रिसमस'च्या रिलीजपूर्वी तिनं एक मोठा खुलासा केला.
कतरिना कैफचा खुलासा : कतरिनानं आपल्या मॉडेलिंगच्या दिवसांची आठवण करून देताना म्हटलं की, तिला फिटनेस क्वीन मलायका अरोरा खूप आवडते. कतरिनानं खुलासा केला की तिनं मलायका अरोरा, मधु सप्रे आणि लक्ष्मी मेननला तिच्या मॉडेलिंगच्या दिवसांमध्ये ती रोल आयडॉल मानत होती. पुढं तिनं सांगितलं की, ती या सर्वांना फॉलो करायची आणि तिला सुपरमॉडेल बनायचं होतं. मलायका अरोरा ही सुपरस्टार सलमान खानचा लहान भाऊ अरबाज खानची एक्स पत्नी आहे. दरम्यान कतरिना कैफ आगामी चित्रपट 'मेरी ख्रिसमस'मध्ये विजय सेतुपती, राधिका आपटे, संजय कपूर, आदिती गोवित्रीकर, विनय पाठक, अश्विनी काळसेकर यांच्यासोबत दिसणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'मेरी ख्रिसमस' चित्रपटाबद्दल : 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटाचं दिग्दर्शन श्रीराम राघवन यांनी केलं आहे. या चित्रपटाचे निर्माते रमेश तौरानी, संजय राउत्रे, केवल गर्ग, जया तौरानी हे आहेत. 'मेरी ख्रिसमस' चित्रपटाला प्रीतम यांनी संगीत दिलं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन श्रीराम राघवन यांनी केलं आहे. हा चित्रपट हिंदी आणि तमिळमध्ये रिलीज होईल. कतरिना कैफच्या वर्क्रफंटबद्दल बोलायचं झालं ती कार्तिक आर्यनसोबत 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. तिचा हा चित्रपट 14 जून 2024 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होईल. या चित्रपटाचं दिग्दर्शन कबीर खान यांनी केलं आहे. याशिवाय ती पुढं फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' या चित्रपटामध्ये दिसेल.
हेही वाचा :