मुंबई - Katrina Kaif : चित्रपटसृष्टीत अनेक कलाकार व्यवसायांत उतरताना दिसतात. बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफनं आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून सुरू केली होती. त्यानंतर तिला सलमान खाननं साथ दिली आणि हिंदी चित्रपटसृष्टीत तिनं पदार्पण केलं. हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर ती हिंदी भाषा शिकली. कतरिनानं स्वत:वर खूप मेहनत घेतली. त्यानंतर ती एक बॉलिवूडमधील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाऊ लागली. 3-4 वर्षांपूर्वी तिनं आपला एक व्यवसाय सुरू केला.
![Katrina Kaif](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/18-11-2023/mh-mum-ent-katrina-kaif-successful-businesswoman-mhc10001_18112023153328_1811f_1700301808_718.jpg)
![Katrina Kaif](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/18-11-2023/mh-mum-ent-katrina-kaif-successful-businesswoman-mhc10001_18112023153328_1811f_1700301808_949.jpg)
![Katrina Kaif](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/18-11-2023/mh-mum-ent-katrina-kaif-successful-businesswoman-mhc10001_18112023153328_1811f_1700301808_1087.jpg)
कतरीना कैफचा 'के ब्युटी' ब्रँड : कतरिना कैफची प्रचंड फॅन फॉलोईंग असल्यानं तिला तिच्या व्यवसायात फायदा झाला. तिनं 2019मध्ये 'के ब्युटी' या ब्रँड सुरू केला. या ब्रँडचे अनेक ब्युटी प्रॉडक्ट मार्कटमध्ये पाहिला मिळते. या प्रॉडक्टची विक्री तिनं ऑन लाईन सुरू केली. काही दिवसानंतर तिच्या व्यवसायानं गती धरली आणि आता तिचा ब्युटी ब्रँड एक मोठा ब्रँड झाला आहे. कतरिना कैफ प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत आता बिझनेस वुमन देखील आहे. 'के ब्युटी' च्या यशामुळं ती आता चर्चेत आली आहे. कॅटला अनेक व्यासपीठांवर एक स्त्री उद्योजिका म्हणून आमंत्रित केले जाते.
![Katrina Kaif](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/18-11-2023/mh-mum-ent-katrina-kaif-successful-businesswoman-mhc10001_18112023153328_1811f_1700301808_659.jpg)
कतरीना कैफ व्यक्त केली भावना : अश्याच एका कार्यक्रमात तिला बोलविण्यात आले होते. यावेळी तिनं उद्योजकीय प्रवासाविषयी बोलताना जागतिक स्तरावरील प्रसिद्ध फॅशन व्यवसायाबद्दल काही खास गोष्टी शेअर केल्या. कॅटनं सांगितलं, ''2019 साली जेव्हा 'के ब्युटी' सुरु करायचं ठरवलं, तेव्हा मनात धाकधूक होती. जागतिक ब्रँडस् प्रमाणेच भारतीय स्त्रियांना उत्तम सौंदर्य प्रसाधने, तेही किफायतशीर किंमतीत, उपलब्ध करून देण्याची माझी इच्छा होती. बिझनेस करण्याचे प्रशिक्षण नसले तरी लोकांच्या प्रेम माझ्याजवळ होते. कुठलाही व्यवसाय करण हे नक्कीच आव्हानात्मक आहे. उद्योजिका बनणे आणि माझा ब्रँड लोकांच्या पसंतीस येणं हा प्रवास माझ्यासाठी खास आहे. अनेकजण, अभिनेत्री म्हणून माझ्यावर खूप प्रेम करतात याशिवाय ते एक व्यावसायिका म्हणूनही मला प्रेम देतात. ही गोष्ट मला समाधान देणारी आहे. 'के ब्युटी' हा ब्रँड गेल्या चार वर्षांपासून उत्तमपणे कार्यरत असलेला ब्रँड आहे याचा मला खूप अभिमान आहे''. दरम्यान कतरिना कैफची प्रमुख भूमिका असलेला 'टायगर 3' सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. 'मेरी क्रिसमस' हा तिचा आगामी चित्रपट क्रिसमसच्या आधी 8 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :