ETV Bharat / entertainment

निर्माती म्हणून क्लॅपबोर्डवर नाव झळकल्याने करीना कपूर उत्साहीत - करीना कपूर आगामी चित्रपट

हंसल मेहताच्या ( Hansal Mehta ) दिग्दर्शन करत असलेल्या चित्रपटातून, करीना कपूरने ( Kareena Kapoor ) निर्माती म्हणून पदार्पण केले आहे. गुरुवारी, करीनाने इन्स्टाग्राम स्टोरीजवर प्रॉडक्शनमध्ये प्रवेश केल्यामुळे तिचा उत्साह शेअर केला आहे. अभिनेत्रीने एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तिने एक क्लॅपबोर्ड धरलेला दिसत आहे ज्यावर निर्माती म्हणून तिचे नाव लिहिले आहे.

क्लॅपबोर्डवर नाव झळकल्याने करीना कपूर उत्साहीत

author img

By

Published : Oct 7, 2022, 9:42 AM IST

मुंबई - बॉलिवूड स्टार करीना कपूर खानने ( Bollywood star Kareena Kapoor ) गुरुवारी सांगितले की तिने लंडनमध्ये दिग्दर्शक हंसल मेहता यांच्यासोबत तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. हा फीचर प्रोजेक्ट, कथितरित्या एक खून रहस्य असलेल्या या चित्रपटात करीना एक गुप्तहेर म्हणून दिसणार आहे. बालाजी मोशन पिक्चर्सच्या माध्यमातून एकता कपूरने ( Ekta Kapoor ) याची सहनिर्मिती केली आहे.

हंसल मेहताच्या दिग्दर्शनातून, करिनाने निर्माती म्हणूनही पदार्पण केले आहे. निर्माती बनल्यामुळे अभिनेत्री ईनंदात आहे. गुरुवारी, करीनाने इन्स्टाग्राम स्टोरीजवर निर्माती म्हणून काम सुरू केल्यानंतर तिचा उत्साह शेअर केला. अभिनेत्रीने एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तिने एक क्लॅपबोर्ड धरलेला दिसत आहे ज्यावर निर्माती म्हणून तिचे नाव लिहिले आहे.

क्लॅपबोर्डवर नाव झळकल्याने करीना कपूर उत्साहीत
क्लॅपबोर्डवर नाव झळकल्याने करीना कपूर उत्साहीत

"क्लॅपबोर्डवर माझे नाव पाहून खूप उत्साही वाटत आहे...," असे करीनाने लिहिले आणि त्यानंतर हार्ट इमोजी टाकला आहे. अद्याप शीर्षक नसलेल्या या चित्रपटाचे चित्रीकरण लंडनमध्ये आणि दोन सत्रात होणार आहे. दुस-या शेड्यूलसाठी बाहेर पडण्यापूर्वी करीना आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी देशात परतणार आहे. आगामी चित्रपटाबद्दल फारसे काही उघड झाले नसले तरी, हंसल मेहता सारखा दिग्गज दिग्दर्शक आणि करीना सारखी उत्साही निर्माती एकत्र आल्याने चाहत्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.

हंसल मेहताच्या चित्रपटाव्यतिरिक्त, अभिनेत्री करीना प्रसिद्ध लेखक केगो हिगाशिनो यांच्या 2005 च्या सर्वाधिक विकल्या गेलेल्या जपानी कादंबरीवर आधारित चित्रपट निर्माता सुजॉय घोष यांच्या रहस्यमय चित्रपटामध्ये देखील दिसणार आहे. नेटफ्लिक्सच्या या चित्रपटात विजय वर्मा आणि जयदीप अहलावत यांच्याही भूमिका आहेत. 2018 मध्ये आलेल्या वीरे दी वेडिंगनंतर करीना चित्रपट निर्मात्या रिया कपूरसोबत काम करणार आहे.

हेही वाचा - 'rrr' ऑस्करमध्ये वैयक्तिक श्रेणींसाठी अप्लाय, राजमौली आणि टीमला यशाची खात्री

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.