ETV Bharat / entertainment

Karan Johar News : करण जोहरचा ब्रिटिश संसदेकडून गौरव, ग्लोबल एंटरटेनमेंटमध्ये २५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल सन्मान - ब्रिटिश संसदेने सन्मानित केले

बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहरने सिनेविश्वात 25 वर्षे पूर्ण केली आहेत. त्यामुळे त्याला ब्रिटिश संसदेने सन्मानित केले आहे. 25 वर्षात करण जोहरने बॉलिवूडमध्ये अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिली आहे, त्यामुळे करणला ब्रिटीश संसदेत संसद सदस्यांच्या उपस्थितीत ग्लोबल एंटरटेनमेंटमधील योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले.

Karan Johar
करण जोहर
author img

By

Published : Jun 21, 2023, 10:23 AM IST

मुंबई : बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहरने इंडस्ट्रीला अनेक चित्रपट दिले आहेत. नुकतीच त्याने सिनेविश्वात 25 वर्षे पूर्ण केली आहेत. ज्यासाठी त्यांना ब्रिटिश संसदेने सन्मानित केले आहे. 25 वर्षात करण जोहरने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले, त्यापैकी अनेकांचे शूटिंग युनायटेड किंगडममध्येही झाली आहे.करण जोहरला ब्रिटीश संसदेत संसद सदस्यांच्या उपस्थितीत ग्लोबल एंटरटेनमेंटमधील योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. या कर्यक्रमाचे आयोजन पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टर येथे करण्यात आले होते. करणसाठी हा दिवस खास आहे, कारण आज त्यांनी चित्रपट निर्माता म्हणून 25 वर्षे पूर्ण केली आहेत. विशेष म्हणजे, कुछ कुछ होता है, ए दिल है मुश्कील इत्यादी सारख्या त्याच्या आयकॉनिक चित्रपटांचे शूटिंग युनायटेड किंगडममध्ये झाली आहे.

करणने सोशल मीडियावर दोन फोटो शेअर केला आहे, ज्यात तो हातात सन्मान फ्रेम पकडून आहे. या फोटोत करणने काळ्या रंगाचा सूट परिधान करून यावर एक काळ्या रंगाचा चश्मा घातला आहे. तर दुसऱ्या फोटोत बॅरोनेस वर्मा या करणला सन्मान फ्रेम देताना दिसत आहे. करणने फोटो शेअर करत लिहले, 'आजचा दिवस खूप खास होता! लिसेस्टरच्या आदरणीय बॅरोनेस वर्मा यांच्या हस्ते लंडनमधील ब्रिटिश संसदेच्या सभागृहात सन्मानित झाल्याबद्दल मी भाग्यवान आणि मनापासून कृतज्ञ आहे. मी चित्रपटसृष्टीत चित्रपट निर्माता म्हणून माझे २५ वे वर्ष साजरे केले आणि मी या निमित्याने 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चा टीझर देखील लाँच केला! 'हा त्या दिवसांपैकी एक आहे जिथे मी स्वतःला चिमटा काढतो आणि मला जाणवते की स्वप्ने सत्यात उतरतात. माझ्या प्रवासात तुम्ही माझ्यावर दाखवलेल्या निस्सीम प्रेमाबद्दल सर्वांचे आभार. आणि मी तुम्हाला वचन देतो, अजून बरेच काही करणार आहे!

करणचे 'कभी खुशी कभी गम' आणि 'माय नेम इज खान' हे त्यांचे ब्लॉकबस्टर चित्रपट यूके बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारे भारतीय चित्रपट ठरले आहे. याशिवाय या चित्रपटाने नवीन विक्रम प्रस्थापित केला. सध्या, करण हा धर्मा प्रॉडक्शनचा मालक आहे, जो भारतातील टॉप प्रोडक्शन हाऊसपैकी एक आहे आणि त्याने या बॅनरखाली अनेक यशस्वी चित्रपटांची निर्मिती केली आहे. ब्रह्मास्त्र पार्ट 1 शिव, बाहुबली, सूर्यवंशी, ये जवानी है दिवानी, कभी अलविदा ना कहना इत्यादी ब्लॉकबस्टर चित्रपट आहेत. करणने बॉलिवूडमध्ये 25 वर्ष पुर्ण झाल्यानंतर त्याने त्याच्या या वर्षी चित्रपटसृष्टीत २५ वर्षे पूर्ण केल्यावर, करण त्याचा पुढचा चित्रपट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' यूके आणि ग्लोबल थिएटर्समध्ये २८ जुलै रोजी रिलीज करणार आहे.

हेही वाचा :

  1. Ram Charan upasana baby girl :'मेगा प्रिन्सेस'च्या भेटीसाठी अल्लू अर्जु हॉस्पिटलमध्ये, नात भाग्यवान असल्याचे चिरंजीवींचे मत
  2. Dipika Chikhlia : चाहत्यांच्या मागणीनुसार 'रामायण' फेम अभिनेत्री दीपिका चिखलियाने धारण केले माता सीताचे रूप
  3. Ram Charan Upasana : राम चरण, उपासना कोनिडेलाच्या 'मेगा प्रिन्सेस'चा जयजयकार करण्यासाठी अपोलो रुग्णालयाबाहेर चाहत्यांची गर्दी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.