मुंबई -Karan Johar On Animal: अभिनेता रणबीर कपूर स्टारर 'अॅनिमल' चित्रपट अनेकांना खूप आवडला आहे. अलीकडेच मेगा पॅन इंडिया राऊंडटेबल 2023 मध्ये उपस्थित असलेल्या करण जोहरनं संदीप रेड्डी वंगा यांच्या 'अॅनिमल' चित्रपटाचे कौतुक केलं. राऊंड टेबल संवादादरम्यान, करण जोहर सांगितलं की, ''जेव्हा मी म्हटलं, मला 'अॅनिमल' चित्रपट आवडला, तेव्हा काही जणांनी मला म्हटलं की तू 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाची निर्मिती केली आहे. मी म्हणालो की मी तुमच्याशी सहमत आहे, कारण माझ्यासाठी 'अॅनिमल' हा वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे'.
करण जोहरनं केलं 'अॅनिमल'चं कौतुक : करणनं पुढं म्हटलं, "काही विधानं करण्यासाठी हिंमत लागते. लोकांमध्ये असताना आपण निर्णय घेण्यासाठी भीत असतो. मला खूप आवडलेल्या कबीर सिंग चित्रपटाच्या रिलीजच्या काळात मला वाटायचं , की मी या चित्रपटावर विधान केलं तर लोक मला वाईट नजरेनं बघतील. पण मला हा चित्रपट आवडला. आता मी याबद्दल काही पर्वा करत नाही''. करण जोहरनं पुढं सांगितलं की, या चित्रपटाची कहाणी खूप मजबूत होती. हा चित्रपट पाहताना माझ्या डोळ्यात अश्रू होते. हा चित्रपट मी चित्रपट दोनदा पाहिला आहे. 'अॅनिमल' गेम चेंजर असल्याचं त्यानं म्हटलं आहे.
'अॅनिमल' चित्रपटानं केली 'इतकी' कमाई : सिद्धार्थ आनंदच्या अॅक्शनपट 'पठाण'ला 'अॅनिमल'नं मागे टाकले आहे. 2023 च्या शेवटच्या वीकेंडमध्ये या चित्रपटानं 4.07 कोटी रुपयांची कमाई केली होती. 'अॅनिमल'नं आता देशांतर्गत 544.93 कोटींचा टप्पा पार केला आहे. 'जवान' नंतर 2023 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट हा ठरला आहे. 'अॅनिमल' या चित्रपटानं जगभरात 817.36 कोटींची कमाई केली आहे. 2023 वर्षात रिलीज झालेल्या या चित्रपटानं चित्रपटगृहांमध्ये राज्य केलं. 'अॅनिमल' चित्रपटामध्ये रणबीर कपूरशिवाय रश्मिका मंदान्ना, तृप्ती डिमरी, बॉबी देओल, अनिल कपूर, शक्ती कपूर आदी कलाकारांनी महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.
हेही वाचा :