ETV Bharat / entertainment

Tejas tanks at box office : कंगनाचा 'तेजस' सपशेल आपटला, निर्मात्याला 50 कोटीचा भुर्दंड - तेजस बॉक्स ऑफिस कलेक्शन

Tejas tanks at box office : कंगना रणौतचा अलिकडे रिलीज झालेला 'तेजस' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला. रिलीजच्या 14 दिवसांनंतर चित्रपटानं 6 कोटी रुपयांपेक्षा किंचित जास्त कमाई करण्यासाठीही आटापिटा केला.

Tejas tanks at box office
तेजस बॉक्स ऑफिस कलेक्शन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 9, 2023, 2:55 PM IST

मुंबई - Tejas tanks at box office : कंगना रणौतच्या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवीय. 2019 पासून तिच्या एकाही चित्रपटाला यश आलेलं नाही. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या तिच्या 'तेजस' या चित्रपटामुळे निर्मात्याचं 50 कोटीचं नुकसान झालंय. हा चित्रपट 27 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला आणि 14 दिवस थिएटरमध्ये लावल्यानंतरही जेमतेम 6 कोटींचा गल्ला जमा झाला.

अनेक वर्षांपासून कंगना रणौतचा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केलेली नाही. तिचा नुकताच प्रदर्शित झालेला 'तेजस' चित्रपट तिच्यासाठी आणखी एक अपयशी ठरलाय. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कंगनानं खूप प्रयत्न केलं. पण चित्रपट पाहिल्यानंतर माऊथ पब्लिसिटी होऊ शकली नाही. एका रिपोर्टनुसार, चित्रपटाला 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

रॉनी स्क्रूवाला निर्मित 'तेजस' चित्रपट 27 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर 14 दिवस चालल्यानंतर गुरुवारपर्यंत केवळ 6.06 कोटी रुपये कमावले. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर अत्यल्प उत्पन्न आणि आंतरराष्ट्रीय बाजारातून केवळ 70 लाख रुपये कमावल्यामुळे निर्मात्यांना 50 कोटी रुपयांचं नुकसान सोसावं लागलंय. चित्रपटाचे ओटीटी, सॅटेलाइट आणि संगीत हक्क 17 कोटी रुपयांना विकले गेलेत. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही स्तरावरील वितरकांनी बॉक्स ऑफिस कलेक्शनमधून 2.23 कोटी रुपये कमावलेत.

निर्माते केवळ 19.23 कोटी रुपयाचा गल्ला वसूल करू शकलेत. त्यामुळे त्यांचे एकूण नुकसान 50.77 कोटी रुपये झालंय. कंगनाचा यापूर्वीचा 'धाकड' हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला होता. , धाकडच्या निर्मात्यांना 78.72 कोटी रुपयांचे नुकसान झालंय. दीपक मुकुट, सोहेल मकलाई आणि हुनर मुकुट यांनी अनुक्रमे 'धाकड'चे निर्माते आणि सहनिर्माते म्हणून काम केलं होतं. त्याच्या पूर्ण थिएटर रनमध्ये, 'धाकड' चित्रपटानं स्थानिक पातळीवर 2.58 कोटी रुपये गोळा केले होते.

2019 मध्ये 'मणिकर्णिका'च्या यशानंतर कंगनाच्या चित्रपटांना फारसे यश मिळालेले नाही. 'मणिकर्णिका'ने बॉक्स ऑफिसवर एकूण 92.19 कोटींची कमाई केली. त्यानंतर आलेल्या 'जजमेंटल है क्या' आणि 'पंगा' या चित्रपटांनी अनुक्रमे 33.11 कोटी आणि 28.92 कोटी रुपयांची कमाई केली. कंगनाने कोविड महामारीदरम्यान जयललिताच्या जीवनावरील 'थलायवी' हा बायोपिक देखील रिलीज केला. या चित्रपटानं देशभरात अनेक भाषांमध्ये रिलीज होऊनही केवळ 1.46 कोटी रुपये कमावले.

हेही वाचा -

  1. The Archies Trailer Out: झोया अख्तर दिग्दर्शित 'द आर्चीज'चा कर्णमधुर, नेत्रसुखद ट्रेलर प्रदर्शित

2. Samantha Ruth Prabhu : सामंथा रुथ प्रभूनं आरोग्य आणि नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटावर केला खुलासा

3. Koffee With Karan 8 : 'फिल्म इंडस्ट्रीत प्रेम आणि दोस्ती कायमस्वरुपी नसते' : कार्तिकसोबत ब्रेकअपबद्दल सारानं सोडलं मौन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.