मुंबई - थलायवी या दाक्षिणात्य चित्रपटानंतर आता अभिनेत्री कंगना रणौत आणखी एका तामिळ चित्रपटात दिसणार आहे. यावेळी, अभिनेता पी. वासू दिग्दर्शित चंद्रमुखी 2 मध्ये चंद्रमुखीची मुख्य भूमिका साकारणार आहे. 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या प्रीक्वलमध्ये सुपरस्टार रजनीकांत आणि ज्योतिका सरवणन यांनी भूमिका केल्या होत्या. चंद्रमुखी हा मल्याळम चित्रपट मणिचित्रथाझूचा रीमेक होता आणि अक्षय कुमार-स्टारर भूल भुलैया म्हणून हिंदीमध्ये रूपांतरित झाला.
चंद्रमुखी 2 मध्ये, कंगना राजाच्या दरबारात एका प्रसिद्ध नर्तिकेची भूमिका साकारताना दिसणार आहे जी तिच्या नृत्य कौशल्यासाठी आणि चित्तथरारक सौंदर्यासाठी ओळखली जाते. कंगना रणौतसोबत प्रसिद्ध तमिळ अभिनेता राघव लॉरेन्स दिसणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कॉस्च्युम डिझायनर नीता लुल्ला या चित्रपटावर काम करणार आहेत, तिने या व्यक्तिरेखेचे रेखाटन करून चित्रपटाची उत्सुकता वाढवली आहे.
नीता लुल्ला यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नमूद केले की, "तिची अदा, तिचे दिसणे, तिचे केस, तिची भूमिका आणि नृत्य कौशल्य हे या व्यक्तीरेखेसाठीयोग्य आहे. माझ्यासाठी ती चंद्रमुखी आहे. हा एक सुंदर पण आव्हानात्मक अनुभव देणारा चित्रपट आहे. या प्रोजेक्टमध्ये कंगनासोबत पुन्हा काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे, एक अभिनेत्री म्हणून तिची ताकद ती साकारत असलेल्या पात्रात स्वतःला झोकून देण्याची तिच्यात क्षमता आहे.
सूत्रांनुसार, कंगना डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलचे शूटिंग सुरू करणार आहे. अभिनेत्री तिच्या दुसर्या दिग्दर्शनातील इमर्जन्सी चित्रपटामधून थोडा ब्रेक घेणार आहे आणि इमर्जन्सी संपल्यानंतर चंद्रमुखी 2 चे दुसरे शेड्यूल जानेवारीमध्ये सुरू होईल.
जर स्त्रोतांवर विश्वास ठेवला गेला तर चंद्रमुखी 2 ची निर्मिती लाइका या सर्वात मोठ्या प्रॉडक्शन हाऊसने केली आहे ज्याचा नुकताच रिलीज झालेला पीएस 1 हा चित्रपट होता. दरम्यान, कंगनाकडे तेजस हा चित्रपट देखील आहे ज्यामध्ये ती भारतीय वायुसेनेच्या पायलटची भूमिका साकारणार आहे.
हेही वाचा - प्रभासने क्रिती सेनॉनला घातली लग्नाची मागणी, लवकरच होईल एंगेजमेंट