ETV Bharat / entertainment

Kangana Ranaut : रणौतने केली सनी देओलची पाठराखण, वाचा व्हिडिओवर काय दिली प्रतिक्रिया... - कंगना रणौतने कमेंट करत सनीचा बचाव केला

सनी देओलचा चाहत्यावर ओरडतानाचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेक कमेंट येत आहेत. दरम्यान आता या व्हिडिओवर कंगना रणौतने कमेंट करत सनीचा बचाव केला आहे.

Kangana Ranaut and sunny deol
कंगना राणौत आणि सनी देओल
author img

By

Published : Aug 19, 2023, 5:23 PM IST

मुंबई : कंगना रणौत सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. प्रत्येक मुद्द्यावर आपले मत मांडायला ती मागेपुढे पाहत नाही. आता अलीकडेच, तिने एका व्हिडिओवर कमेंट केली, ज्यामध्ये सनी देओल त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी आलेल्या चाहत्यावर ओरडताना दिसत आहे. सनीच्या या व्हिडिओवर अनेक कमेंट येत आहेत. आता कंगना देखील या व्हिडिओवर कमेंट करत सनी देओलचा बचाव करत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, सनी विमानतळाच्या आत त्याचा बॉडीगार्ड आणि टीममधील इतर काही लोकांनी घेरलेला दिसत आहे. या व्हिडिओत सनी वेगाने चालताना दिसत आहे.

सनी देओलचा केला कंगना रणौतने बचाव : व्हिडिओमध्ये एका चाहत्याने सनीच्या दिशेने धाव घेतली आणि त्याला सेल्फीची विनंती केली. त्यानंतर या चाहत्याने सनीसोबत सेल्फी क्लिक काढायला थोडा वेळ घेतला तेव्हा सनी रागाने म्हटले, 'अरे ले ना फोटो'. त्यानंतर त्याच्या बॉडीगार्डने त्याच्या फॅनला बाजूला केले आणि सनी तिथून निघून गेला. सनीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेकजण कमेंट करत आहेत. काही यूजर सनीचा बचाव करत आहेत. तर काहीजण त्याला ट्रोल करत आहेत. याशिवाय या व्हिडिओवर कमेंट करत कंगनाने सनीची साथ देत त्याच्या बाजूने बोलत म्हटले, एखादी कोणतीही घटना एखाद्याच्या हेतूचे किंवा वागण्याचे सूचक असू शकत नाही. सेल्फी कल्चर भयंकर आहे, लोक आपल्या खूप जवळ येतात', असे तिने कमेंटमध्ये सांगितले.

'गदर २'चे यश : सध्या सनी त्याच्या 'गदर २' या चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत आहे. 'गदर २' ने थिएटरमध्ये एक आठवडा पूर्ण केला असून, भारतात एकूण २८३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ८ व्या दिवशी, १८ ऑगस्ट रोजी, चित्रपटाने १९.०५ कोटी रुपये कमावले, या चित्रपटाने अखेरीस शुक्रवारी २०.५ कोटी रुपयांची कमाई करून ३०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आणि चित्रपटाचे एकूण संकलन ३०५.१३ कोटी रुपये झाले. हिंदी पट्ट्यातील चित्रपटाची एकूण व्याप्ती ३२.०६% इतकी आहे. हा चित्रपट लवकरच ४०० कोटी कमाई करेल असे सध्या दिसत आहे.

हेही वाचा :

  1. Border 2 : 'गदर २'च्या ऐतिहासिक यशानंतर सनी देओल 'बॉर्डर २' चित्रपटात झळकणार...
  2. Ghoomer Collection Opening Day : 'घूमर' चित्रपट पहिल्याचं दिवशी आला व्हेंटिलेटरवर....
  3. Jailer box office collection 9 day : 'जेलर' चित्रपटाने घेतली मोठी भरारी; जाणून घ्या नवव्या दिवसाचे कलेक्शन...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.