मनाली (हिमाचल प्रदेश) - अभिनेत्री कंगना रणौतने ( Actor Kangana Ranaut ) गुरुवारी तिच्या चाहत्यांना हिमाचल प्रदेशातील तिच्या दुसऱ्या नवीन घराची ( Kangana new home ) सफर घडवली आहे. एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये कंगनाने स्पष्ट केले की, तिचे हे नवीन घर नदीचे दगड, स्थानिक स्लेट आणि लाकडापासून बनवले गेले आहे. नवीन घराची सजावट करताना तिने 'हिमाचली पेंटिंग्ज, विणकाम, रग्ज, भरतकाम आणि लाकडी करीगिरी' यांचा समावेश केल्याचेही तिने शेअर केले.
"सर्व डिझाइन प्रेमींसाठी येथे काही विशेष आहे, ज्यांना सजावट आवडते आणि पर्वतीय वास्तुकलेबद्दलची उत्सुकता आहे जी स्थानिक पण प्राचीन आणि खोलवर पारंपारिक आहे. मी एक नवीन घर बांधले आहे, हे माझ्या मनालीतील सध्याच्या घराचा विस्तार आहे पण यावेळी ते अस्सल ठेवले आहे. सामान्यत: नदीचे दगड, स्थानिक स्लेट आणि लाकडापासून बनवलेली पर्वतीय शैली. मी हिमाचली पेंटिंग, विणकाम, रग्ज, भरतकाम आणि लाकडी कारीगिरी देखील सजावटीत समाविष्ट केली आहे.... एक नजर टाका, हे फोटो हिमाचलच्या एका प्रतिभावान छायाचित्रकाराने क्लिक केले आहेत @photovila1 ", असे कंगनाने पोस्टला कॅप्शन दिले आणि तिच्या घराच्या फोटोंची स्ट्रिंग टाकली.
कंगनाच्या घराला लाकडी दारे, भिंतींना सजवणारी मोठी पेंटिंग्ज आणि पोस्टर्स आहेत. आपल्याला एक मोठा सोफा सेट व त्यावर आरामदायी उशीही दिसते. वेळ घालवण्यासाठी कंगनाच्या घरात अनेक खेळ आणि मनोरंजनाची साधनेही आहेत.
तीन बेडरूममध्ये प्रत्येक वेगवेगळ्या रंगातील किंग-साईझ आरामदायक बेड आणि सूर्यप्रकाशात भिजण्यासाठी मोठ्या खिडक्या आहेत. घरात पूल टेबल देखील आहे.
दुसर्या पोस्टमध्ये, कंगना सुंदर पेंटिंग्जने सजवलेल्या भिंतीच्या बाजूला पायऱ्याजवळ उभी असलेली दिसते. तिने लिहिले की ही भिंत हिमाचल आणि तिथल्या विविध परंपरा, कला आणि लोकांबद्दल असलेली एक ओढ आहे.
दरम्यान, वर्क फ्रंटवर, दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित 'इमर्जन्सी'मध्ये कंगना दिसणार आहे. याशिवाय कंगना 'टिकू वेड्स शेरू' हा चित्रपटही घेऊन येत आहे, ज्यात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर मुख्य भूमिकेत आहेत. अलिकडेच तिचा धाकड हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यश मिळवू शकला नव्हता.
हेही वाचा -पूजा हेगडेने इंडिगोच्या कर्मचाऱ्याला घेतले फैलावर, एअरलाइनने मागितली माफी