ETV Bharat / entertainment

ब्रम्हास्त्रची कमाई खोटी असल्याचा कंगना रणौतचा दावा - ब्रह्मास्त्रचे बजेट 650 कोटी

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची भूमिका असलेला ब्रह्मास्त्र चित्रपटाची कमाई नकली ( revenue of Brahmastra is false )असल्याचा दावा अभिनेत्री कंगना रणौतने ( Kangana Ranauts claim ) केला आहे. अधिकाधिक लोक चित्रपट पाहण्यासाठी यावे यासाठी लोकांमध्ये मोठ्या कमाईचा भ्रम पसरवला जात असल्याचे कंगनाने म्हटले आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Sep 12, 2022, 1:58 PM IST

मुंबई - रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची भूमिका असलेला 'ब्रह्मास्त्र' चित्रपट 9 सप्टेंबर रोजी रिलीज झाला. 'ब्रह्मास्त्र'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनने जगभरात 150 कोटींचा आकडा पार केला आहे. करण जोहर, अयान मुखर्जी, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या चित्रपटाच्या कमाईवर खूश आहेत. मात्र, कंगना रणौतने 'ब्रह्मास्त्र'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. अधिकाधिक लोक चित्रपट पाहण्यासाठी यावे यासाठी लोकांमध्ये मोठ्या कमाईचा भ्रम पसरवला जात असल्याचे कंगनाने म्हटले आहे.

'ब्रम्हास्त्र'ची कमाई खोटी असल्याचा कंगना रणौतचा दावा

करण जोहर गँगची ही युक्ती प्रेक्षकांना आपल्या जाळ्यात अडकवण्याची असल्याचे कंगनाने सांगितले. कंगनाने स्पष्ट केले की, चित्रपटाचे कलेक्शन जेवढे सांगितले जात आहे तेवढे नाही. करण जोहरची गँग ( Karan Johars Gang ) प्रेक्षकांमध्ये खळबळ माजवत आहे.

कंगना रणौतने करण जोहरवर कमाईचा आकडा खोटा ( revenue of Brahmastra is false ) सांगत असल्याचा आरोप केला आहे. कंगनाने काही स्क्रीन शॉट्स शेअर करत करण जोहरची टोळी प्रेक्षकांना कशी फसवत आहे आणि त्यांना थिएटरमध्ये खेचत आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

कंगना एवढ्यावरच थांबलेली नाही, ती म्हणाली की तिला 'ब्रह्मास्त्र'च्या कलेक्शनची गणना समजून घेण्यासाठी करण जोहरची मुलाखत घ्यायची आहे. कंगनाने सांगितले की, निर्मात्यांनुसार 'ब्रह्मास्त्र'चे जगभरात दोन दिवसांत 160 कोटी रुपयांचे कलेक्शन झाले आहे. तर कंगना लिहिते, 'शुक्रवारी रिलीज झाला आणि रविवारी खूप हिट झाला. तेही 250 कोटींच्या कलेक्शनसह (जे एक बनावट आकडा आहे).'

ब्रह्मास्त्रचे बजेट 650 कोटी? - करण जोहर आणि त्याच्या सहकाऱ्यांवर निशाणा साधत कंगना म्हणाली, 'VFX सह चित्रपटाचे बजेट 650 कोटी रुपये आहे, तर आम्हाला 410 कोटी रुपये सांगण्यात आले आहे, फक्त प्राइम फोकस सह-निर्माता आहे. याचा अर्थ असा नाही की VFX ची किंमत नाही. हे करण जोहरचे गणित आहे जे आपल्यालाही शिकायचे आहे.

बॉक्स ऑफिस इंडियाकडून आलेले एक ट्विट शेअर करत कंगनाने सांगितले की, 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट खूप हिट होण्यासाठी तयार आहे. ट्विटला उत्तर देताना कंगना म्हणाली की बॉक्स ऑफिस इंडिया हँडल मला आणि माझ्यासारख्या अनेकांना 'ब्रह्मास्त्र'च्या कलेक्शनबद्दल त्रास देत आहे, कारण 'माफिया' त्यांना पगार देत आहे.

हेही वाचा - शाहरुखमुळे स्वरा भास्करचे लव्ह लाईफ उध्वस्त, जाणून घ्या पूर्ण सत्य

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.