ETV Bharat / entertainment

kangana ranaut : महादेव अ‍ॅप प्रकरणात ३४ सेलिब्रिटींना कंगना राणौतनं खडसावलं - महादेव अ‍ॅप प्रकरण

kangana ranaut : कंगना राणौतचा दावा आहे की, महादेव अ‍ॅपच्या प्रवर्तकांनी तिच्याशी एक कोटी डॉलर्सच्या जाहिरातीसाठी संपर्क साधला होता, मात्र प्रत्येक वेळी तिनं यावर नकार दिला. ईडीच्या समन्समध्ये अ‍ॅपशी जे बॉलीवूड स्टार्स अडकले आहेत, त्यावर तिनं टीका केली आहे.

kangana ranaut
कंगना राणौत
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 7, 2023, 5:17 PM IST

मुंबई - kangana ranaut : कंगना राणौत ही प्रत्येक मुद्द्यावर आपले बिनधास्तपणे मत मांडत असते. दरम्यान आता अलीकडेच महादेव अ‍ॅप प्रकरणात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे समोर आली आहेत. याप्रकरणी ईडी ही कसून चौकशी बॉलिवूड कलाकारांची करणार आहेत. याप्रकरणात ज्या कलाकारांचे नाव समोर आले आहेत, त्यांच्यावर कंगनानं निशाना साधला आहे. कंगनानं इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं सांगितलं की, तिलाही या अ‍ॅपच्या जाहिरातीसाठी अनेकदा ऑफर आल्या आहेत आणि त्यासाठी तिला मोठी रक्कमही दिली जात होती. मात्र तिनं यासाठी कधीच होकार दिला नाही.

कंगनाचा इशारा : महादेव अ‍ॅप प्रकरणात 34 सेलिब्रिटींची नावे समोर आली आहेत. ही बातमी शेअर करताना कंगनानं लिहिलं की, 'ही जाहिरात माझ्याकडे एका वर्षात 6 वेळा आली होती. प्रत्येक वेळी तो नवीन ऑफर देऊन काही कोटींनी रक्कम वाढवत असे जेणेकरून मी हो म्हणेन. पण मी प्रत्येक वेळी नकार दिला. हा नवा भारत आहे, स्वतःला सुधारा नाहीतर सुधाराल'. कंगनानं सरळ निशाना या 34 कलाकारांवर साधला आहे.

काय आहे प्रकरण : महादेव अ‍ॅप पोकर हे कार्ड गेम्स, चान्स गेम्स, बॅडमिंटन, टेनिस, फुटबॉल आणि क्रिकेट यांसारख्या अनेक ऑनलाइन गेमवर बेकायदेशीर सट्टेबाजी करणारे अ‍ॅप आहे. हे अ‍ॅप दुबईस्थित सौरभ आणि रवी उप्पल चालवत होते. ही कंपनी दुबईतून चालते जेथे बेटिंग कायदेशीर आहे, मात्र भारतात हे बेकायदेशीर आहे. अलीकडेच या प्रकरणी रणबीर कपूरला रायपूर कार्यालयात बोलावण्यात आल्याची बातमी समोर आली होती. शुक्रवारी, ईडीच्या वकिलाने सांगितले की, रणबीरनं एका आठवड्याचा वेळ मागितला आहे. याप्रकरणात रणबीरला आरोपी म्हणून नाही तर प्रकरण समजून घेण्यासाठी बोलावण्यात येत आहे. महादेव अ‍ॅप प्रकरणात रणबीर कपूर व्यतिरिक्त कपिल शर्मा, हुमा कुरेशी, हिना खान आणि श्रद्धा कपूर, भारती सिंग अशा अनेक सेलिब्रिटींची नावे समोर आली आहेत. आता या प्रकरणात काय करवाई सेलिब्रिटींवर होईल हे येणाऱ्या काळात समजेल.

हेही वाचा :

  1. Bhumi Pednekar on male co stars : पुरुष कलाकारांसोबत काम करताना दुय्यम असल्याचं वाटतं, भूमी पेडणेकरचं विधान
  2. Gayatri Joshi Accident: इटलीतील भीषण अपघातानंतर 'स्वदेस' फेम गायत्री जोशी पती विकास ओबेरॉयसह मायदेशी परत
  3. Jawan surpasses Rs 1100 crore mark : 'जवान'नं 30 दिवसांत जागतिक बॉक्स ऑफिसवर पार केला 1100 कोटींचा आकडा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.