मुंबई - kangana Ranaut Tejas : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत सध्या तिच्या 'तेजस' चित्रपटामुळे चर्चेत आहे. अलीकडेच, तिचा चित्रपट 'तेजस' 27 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात कंगना राणौतनं भारतीय वायुसेनेच्या पायलटची भूमिका साकारली आहे. कंगनानं या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले होते. मात्र तरीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई कमी करत आहे. 'तेजस' चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरला सोशल मीडियावर चांगलीच प्रतिसाद मिळाला होता. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांवर जादू करण्यास अयशस्वी ठरला आहे. दरम्यान कंगनानं चाहत्यांना व्हिडिओद्वारे चित्रपट पाहण्याची विनंती केली आहे.
कंगनानं 'तेजस' थिएटरमध्ये पाहण्याची केली विनंती : कंगना राणौत स्टारर 'तेजस' या चित्रपटाचे दिग्दर्शन सर्वेश मेवाड यांनी केले आहे. या चित्रपटाचे बजेट जवळपास 45 कोटी रुपये आहे. 'तेजस' चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई काही विशेष झालेली नाही. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'तेजस' चित्रपटानं पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 1.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसचे आकडे पाहून कंगना खूपच नाराज दिसत आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप कमाई करत असल्यानं कंगनानं एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये तिनं तिच्या चाहत्यांना चित्रपट पाहण्याची विनंती केली आहे.
- कंगनाने हात जोडून चाहत्यांकडे मदत मागितली : कंगनानं तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती हात जोडून म्हणत आहे की, 'कोविडनंतर आमची हिंदी फिल्म इंडस्ट्री पूर्णपणे सावरलेली नाही. मी मल्टिप्लेक्सच्या प्रेक्षकांना विनंती करते, की जर तुम्ही 'उरी', 'नीरजा', 'मेरी कॉम' यासारखे चित्रपट एन्जॉय केले असतील तर तुम्हाला 'तेजस' देखील खूप आवडेल.
- 'तेजस'ची स्टार कास्ट : कंगना राणौतसोबत 'तेजस' चित्रपटात अंशुल चौहान, वरुण मित्रा, आशिष विद्यार्थी आणि विशाख नायर मुख्य भूमिकेत दिसले आहेत. 'तेजस'पूर्वी कंगना राणौतचे 'धाकड' आणि 'चंद्रमुखी 2' हे सिनेमेही रिलीज झाले होते, मात्र हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले.
हेही वाचा :
- Matthew Perry Death : फ्रेंड्स मालिकेतील अभिनेता मॅथ्यू पेरीचा टबमध्ये आढळला मृतदेह, लॉस एंजेलिस पोलिसांकडून तपास सुरू
- Karva Chauth 2023 : परिणीती चोप्रासह कियारा अडवाणीपर्यंत 'या' अभिनेत्री साजरा करणार पहिला करवा चौथ...
- dating reality show Temptation Island : डेटिंग रिअॅलिटी शो 'टेम्पटेशन आयलंड'चं होस्टींग करणार मौनी रॉयसोबत करण कुंद्रा