मुंबई : रजनीकांत यांच्या 'जेलर' चित्रपटातील 'कावला' हे पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. हा चित्रपट लवकरच रूपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान आता तमन्ना भाटिया चित्रपटामधील गाण्यात डान्स फ्लोअरवर रजनीकांतसोबत डान्स नंबरमध्ये दिसत आहे. नेहमीप्रमाणेच, तमन्नाने तिच्या किलर मूव्ह्सने गाण्यात जीव आणला आहे. दरम्यान, या गाण्यात रजनीकांत देखील त्याच्या सिग्नेचर सनग्लास फ्लिप करताना दिसत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
आयटम साँग : ट्विटरवर निर्मात्यांनी चित्रपटाचा 'कावला' गाण्याचा व्हिडिओ प्रदर्शित केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'कावलाची वेळ आली आहे. लिरिक्स व्हिडिओ रिलीज झाला आहे'. या गाण्यात डान्स मूव्ह्स व्यतिरिक्त, तमन्नाने एक्सप्रेशन्स फार जबरदस्त दिले आहे. तसेच गाण्यात, रजनीकांत देखील आपल्या हटके अंदाजात दिसला आहे. या गाण्यात, तमन्नाने टुपीस परिधान केला आहे. याशिवाय तिने केस हे कुरळे करून मोकळे सोडले आहे. या हेअरस्टाइलमध्ये ती फार हटके दिसत आहे. चित्रपटातील या आयटम साँगमुळे चाहते फार प्रभावित झाले आहे. या चित्रपटाचे सिनेमेट्रोग्राफर विजय कार्तिक कन्नन असून हा चित्रपट फार जास्त जबरदस्त असणार आहे, हे या गाण्यावरून दिसून येत आहे.
-
It’s time to vibe for #Kaavaalaa 💃🏼. Lyric video is out now!💥
— Sun Pictures (@sunpictures) July 6, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
▶️ https://t.co/Pd7nBg8h4l@rajinikanth @Nelsondilpkumar @anirudhofficial @tamannaahspeaks @Arunrajakamaraj @shilparao11 @AlwaysJani #Jailer #JailerFirstSingle
">It’s time to vibe for #Kaavaalaa 💃🏼. Lyric video is out now!💥
— Sun Pictures (@sunpictures) July 6, 2023
▶️ https://t.co/Pd7nBg8h4l@rajinikanth @Nelsondilpkumar @anirudhofficial @tamannaahspeaks @Arunrajakamaraj @shilparao11 @AlwaysJani #Jailer #JailerFirstSingleIt’s time to vibe for #Kaavaalaa 💃🏼. Lyric video is out now!💥
— Sun Pictures (@sunpictures) July 6, 2023
▶️ https://t.co/Pd7nBg8h4l@rajinikanth @Nelsondilpkumar @anirudhofficial @tamannaahspeaks @Arunrajakamaraj @shilparao11 @AlwaysJani #Jailer #JailerFirstSingle
मल्याळम सुपरस्टार मोहनलाल दिसणार खास भूमिकेत : बॉक्स ऑफिसवर चिरंजीवीच्या 'भोला शंकर'शी टक्कर देणारा हा चित्रपट १० ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. दिग्दर्शक नेल्सन दिलीपकुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. रजनीकांतचा 'जेलर' हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या अॅक्शन थ्रिलर चित्रपटामध्ये रजनीकांत एका मिशनवर असलेल्या जेलरच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात मोहनलाल, शिव राजकुमार, जॅकी श्रॉफ, तमन्ना भाटिया, रम्या कृष्णन, योगी बाबू आणि इतर कलाकर देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. मल्याळम सुपरस्टार मोहनलाल या चित्रपटात खास भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाची वाट प्रेक्षक फार आतुरतेने पाहत आहे. हा चित्रपट रूपेरी पडद्यावर काय कमाल दाखविणार हे येणाऱ्या काळात समजेल.
हेही वाचा :