मुंबई : 'जुग-जुग जिओ' चित्रपटाचा ट्रेलर (Jug Jug Jio Trailer) लाँच झाला आहे. अनिल कपूर, कियारा अडवाणी, वरुण धवन, नीतू कपूर, मनीष पॉल यांच्यासह अनेक स्टार्स लॉन्च इव्हेंटमध्ये सहभागी झाले होते. यावेळी चित्रपट निर्माता करण जोहरही उपस्थित होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण जोहर आणि अनिल कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कार्यक्रमादरम्यान अनिल कपूर स्टेजवर आला तेव्हा आधीच उपस्थित असलेल्या करण जोहरने त्याच्या पायांना हात लावण्याचा प्रयत्न केला.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
जेव्हा हे घडते तेव्हा अनिल कपूर दचकून वर उडी मारतो. मात्र, असे काही घडले की, करण सनग्लासेस घेण्यासाठी खाली वाकतो. पण, अनिल कपूरला वाटतं की तो त्याच्या पायाला हात लावणार आहे. अनिल सनग्लासेस उचलतो आणि करणला देतो. यानंतर अभिनेता अनिल करण जोहरला मिठी मारून हसतो. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ खूप पसंत केला जात आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
राज मेहता दिग्दर्शित 'जुग जुग जिओ' चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर हा एक कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. जो २४ जून रोजी (jug jug jio release date) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ट्रेलरबद्दल बोलायचे तर त्याची वेळ 3 मिनिटे आहे. ट्रेलरमध्ये नात्यातील अडथळे दाखवण्यात आले असून, त्यात प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचते.
हेही वाचा - Cannes 2022: धुराच्या ग्रेनेडसह रेड कार्पेटवर महिलांचे आंदोलन