हैदराबाद - साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआर याचा आज ३९ वा वाढदिवस आहे. करोडो लोक फॉलोअर्स असलेला हा अभिनेता आंध्र आणि तेलंगणा राज्यात कमालीचा लोकप्रिय आहे. एनटीआर ज्युनियरचे नाव येताच मनात वेगळेच चित्र निर्माण होते. साऊथच्या सुपरस्टारची क्रेझ कुणापासून लपलेली नाही. पण त्याचं नाव कसं पडलं माहीत आहे का? त्याची कथा खूपच मनोरंजक आहे. एनटीआर ज्युनियरचे खरे नाव नंदमूर्ती तारका रामाराव आहे. पण जगभरात तो एनटीआर ज्युनियर म्हणून ओळखला जातो. याचे श्रेय त्यांचे आजोबा आणि त्यांच्या काळातील प्रसिद्ध अभिनेते-राजकारणी एन.टी. रामाराव यांना जाते.
एका अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवलेले एनटी रामाराव हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यांनी आपल्या नातवाला नाव बदलण्याचा सल्ला दिला, त्यानंतर तो नंदमूर्ती तारका रामाराव यांच्यापासून एनटीआर ज्युनियर झाला आणि आज संपूर्ण जग त्यांना या नावाने ओळखते. हे नाव त्याच्या आजोबांच्या नावासारखे आहे, फक्त अभिनेत्याच्या नावाच्या आधी ज्युनियर आहे, हा दोन नावांमधील मुख्य फरक आहे.
एनटीआर ज्युनियर हा तेलुगु सिनेमाचा सुपरस्टार आहे. त्यांचा जन्म 20 मे 1983 रोजी हैदराबादमध्ये तत्कालिन आंध्र प्रदेश येथे झाला. एनटीआर ज्युनियरला दक्षिणेत 'यंग टायगर' म्हणूनही ओळखले जाते. त्यांचे वडील नंदामुरी हरिकृष्ण हे प्रसिद्ध निर्माता, अभिनेता आणि राज्यसभा सदस्य आहेत. त्यांच्या आईचे नाव शालिनी भास्कर राव आहे. एनटीआर ज्युनियर हा सिने जगतातील सर्वाधिक मानधन घेणारा नायक आहे.
ज्युनियर एनटीआरने 2001 मध्ये 'निन्नू चूडलानी' चित्रपटाद्वारे मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले. पण हा चित्रपट फ्लॉप झाला. यानंतर त्याने त्याच वर्षी 'स्टुडंट नंबर 1' हा चित्रपट केला. या चित्रपटातून त्याला ओळख मिळाली. ज्युनियर एनटीआरने त्याच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक सर्वोत्कृष्ट चित्रपट केले आहेत. त्यापैकी 'टेम्पर' (2015), 'जय लव कुस' (2017), 'आदी' (2002) हे चित्रपट खूप प्रसिद्ध आहेत.
या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'आरआरआर' चित्रपटाने त्याने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. एनटीआर ज्युनियरला दोनदा सर्वोत्कृष्ट तेलुगू अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय दोन राज्य नंदी पुरस्कार आणि चार चित्रपट पुरस्कारही मिळाले आहेत. फोर्ब्स इंडियाच्या १०० सेलिब्रिटींच्या यादीतही त्याचे नाव आले आहे.
हेही वाचा - Cannes 2022: दीपिका पदुकोण लाल गाऊनमध्ये केले आपल्या स्टाईलचे प्रदर्शन