ETV Bharat / entertainment

जॉन अब्राहम आणि अर्जुन कपूरच्या 'एक व्हिलन रिटर्न्स'ची पुन्हा रिलीज तारीख बदलली - Filmmaker Mohit Suri

'एक विलियन रिटर्न्स' ( Ek Villian Returns ) हा चित्रपट 8 जुलै रोजी रिलीज होणारा होता, मात्र आता हा आगामी थ्रिलर चित्रपट आता 29 जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. चित्रपट निर्माते मोहित सूरी ( Mohit Soori ) यांनी मंगळवारी त्यांच्या ट्विटर हँडलवर अपडेट शेअर केले आहेत.

'एक व्हिलन रिटर्न्स'ची पुन्हा रिलीज तारीख बदलली

author img

By

Published : May 11, 2022, 11:42 AM IST

नवी दिल्ली - 2014 चा हिट चित्रपट 'एक विलियन' ( Ek Villian ) चित्रपटाचा बहुप्रतिक्षित सिक्वेलची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. 'एक विलियन रिटर्न्स' ( Ek Villian Returns ) हा चित्रपट 8 जुलै रोजी रिलीज होणारा होता, मात्र आता हा आगामी थ्रिलर चित्रपट आता 29 जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

चित्रपट निर्माते मोहित सूरी यांनी मंगळवारी त्यांच्या ट्विटर हँडलवर अपडेट शेअर केले आहेत. त्यांनी लिहिले, "'एक विलियन रिटर्न्स'ला एक नवीन रिलीज डेट मिळाली, 29 जुलै 2022."

मोहित सुरीने याआधी एका निवेदनात म्हटले होते की, "'एक व्हिलन' हा माझा पॅशन प्रोजेक्ट आणि प्रेमाचे काम आहे. अजूनही 'एक व्हिलन'साठी मिळालेले प्रेम मला भारावून टाकते. 'एक व्हिलन रिटर्न्स'सोबत मला खात्री आहे, प्रेम फक्त वाढतच जाणार आहे. आणि मी चित्रपटाबद्दल फार काही सांगू शकत नसलो तरी, मी खात्री देतो की ही एक रोमांचक रोलरकोस्टर राईड असणार आहे."

मोहित सुरी दिग्दर्शित आणि टी सिरीज आणि वालाजी टेलिफिल्मस् द्वारे संयुक्तपणे निर्मित 'एक विलियन रिटर्न्स' या चित्रपटात जॉन अब्राहम, अर्जुन कपूर, दिशा पटानी आणि तारा सुतारिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

मोहित सूरीने 'हाफ गर्लफ्रेंड', 'आशिकी 2', 'मर्डर 2', 'जेहर' आणि 'कलयुग' यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. ''एक व्हिलन रिटर्न्स' हा जॉन अब्राहम आणि दिग्दर्शक मोहित सुरी यांच्यातील पहिला सहयोग आहे. अर्जुन कपूरने यापूर्वी मोहितसोबत 'हाफ गर्लफ्रेंड'मध्ये काम केले होते. दिशा पटानीने मोहितच्या शेवटच्या दिग्दर्शनाच्या 'मलंग' चित्रपटात काम केले होते.

हेही वाचा - दिवंगत पत्नी सुनंदाला वादात ओढल्याने विवेक अग्निहोत्री, अनुपम खेरवर संतापले शशी थरुर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.