मुंबई - Dry Dy 2 Trailer: सौरभ शुक्ला दिग्दर्शित 'ड्राय डे'चा ट्रेलर रिलीज आज झाला आहे. या कॉमेडी-ड्रामामध्ये अभिनेता जितेंद्र कुमार आणि श्रिया पिळगावकर मुख्य भूमिकेत असून या वेब सीरिजचा ट्रेलर चेहऱ्यावर हसू फुलवणारा आहे. 'ड्राय डे' वेब सीरिजची कहाणी अंमली पदार्थांचं व्यसन, प्रेम आणि कौटुंबिक त्यागवर आधारित आहे. हा चित्रपट 22 डिसेंबर रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होईल. जितेंद्र आणि श्रिया व्यतिरिक्त या कॉमेडी ड्रामामध्ये अन्नू कपूरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. मोनिषा आडवाणी, मधु भगवान आणि निखिल आडवाणी यांनी या वेब सीरिजची निर्मिती केली आहे.
'ड्राय डे'चा ट्रेलर : या वेब सीरिजमधील आपल्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना जितेंद्र कुमार सांगितलं, "गन्नूची व्यक्तिरेखा साकारताना त्यांना खूप मजा आली, या मनोरंजक व्यक्तिरेखेमध्ये येणे म्हणजे माझ्या टूलबॉक्समध्ये एक नवीन स्किल जोडल्यासारखं होतं. मी खूप आतुर आहे''. या वेब सीरिजमध्ये श्रिया पिळगावकर ही जितेंद्र कुमारच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. 'ड्राय डे'चा ट्रेलर शेअर करताना जितेंद्र कुमारनं लिहिलं, 'या क्रांतीची सुरुवात हँगओव्हरनं होईल. 'ड्राय डे' पाहा प्राईम व्हिडिओवर 22 डिसेंबर रोजी. यासह त्यानं या पोस्टवर दारू आणि स्माईलीचे इमोजी पोस्ट केले आहेत.
जितेंद्र कुमारच्या पोस्टवर आल्या चाहत्यांच्या कमेंट : जितेंद्र कुमारनं शेअर केलेल्या पोस्टवर आता चाहत्यांच्या कमेंटस् येत आहेत. एका चाहत्यानं लिहिलं, ''मी आता प्रतीक्षा करू शकत नाही आहे, हा चित्रपट खूप मजेदार असणार आहे''. याशिवाय दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं, आता प्राईम व्हिडिओवर हा चित्रपट नक्कीचं धमाल करेल, सर तुमचा अभिनय खूप खास आहे''. याशिवाय आणखी एका चाहत्यानं लिहिलं, ''सर लवकर 'पंचायत' रिलीज करू टाका, मी तिसऱ्या सीझनची वाट पाहतोय.'' याशिवाय काहीजणांनी या व्हिडिओवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करून जितेंद्रवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
हेही वाचा :