ETV Bharat / entertainment

Ji Le Jara film delayed : प्रियांका चोप्राच्या तारखा रखडल्या, 'जी ले जरा' चित्रपटाचं शुटिंग लांबणीवर

Ji Le Jara film delayed : फरहान अख्तर दिग्दर्शित जी ले जरा चित्रपटाचे शुटिंग लांबणीवर टाकण्यात आलंय. हॉलिवूडमध्ये कलाकार आणि लेखकांचा संप सुरू असल्यानं परियांका चोप्राच्या तारखा निश्चित होत नाहीत. त्यामुळे या चित्रपटाचे काम सध्या होल्डवर ठेवण्यात आल्याचं फरहान अख्तरनं सांगितलंय.

Ji Le Jara film delayed
जी ले जरा चित्रपटाचे शुटिंग लांबणीवर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 22, 2023, 3:46 PM IST

मुंबई - Ji Le Jara film delayed :फरहान अख्तर पुन्हा एकदा तीन महिलांसह 'जिंदगी ना मिले दोबारा' प्रमाणे सर्वांना रोड ट्रीपवर घेऊन जाणार आहे. या तीन महिला आहेत ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा, कतरिना कैफ आणि आलिया भट्ट. 'जी ले जरा' या नव्या चित्रपटातून या तीन मैत्रीणी अ‍ॅडव्हेंचरस नाट्यमय ट्रीप करणार आहेत. खरंतर तमाम चाहते या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपटाची प्रतीक्षा करत आहेत. यापैकी तुम्हीही एक असाल तर तुम्हाला अजून काही काळ कळ सोसावी लागणार आहे. कारण हा चित्रपट दिवसेंदिवस लांबणीवर पडत चालला असून यामागचा खुलासा फरहान अख्तरने केला आहे.

व्हरायटीला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक फरहान अख्तरने शेअर केले की चित्रपट सध्या होल्डवर ठेवण्यात आलाय. तो म्हणाला, 'आम्हाला सध्या तारखांची अडचण आहे. सध्या हॉलिवूडमध्ये सुरू असलेल्या संपामुळे प्रियांका चोप्राच्या तारखा जमून येत नाहीत. यावर काही उपाय निघू शकत नसल्यामुळे आम्ही गोंधळात आहोत. आता या चित्रपटाचं स्वतःचं नशीब जसं असेल तसं घडंल, यावर आम्ही आता विश्वास बाळगू लागलोय.'

फरहानने सुरुवातीला बोलताना अमेरिकेत सुरू असलेल्या लेखक आणि कलाकारांच्या संपाचा संदर्भ दिला. फरहानचा 'जी ले जरा' हा चित्रपट मैत्रीवर आधारित आहे. 'दिल चाहता है' आणि 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'च्या कथा परंपरेतील हा चित्रपट मनोरंजनाचे खात्री देणारा आहे. आगामी चित्रपटात आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

फरहान अख्तरने ऑगस्ट २०२१ मध्ये 'जी ले जरा'ची घोषणा केली होती. त्यावेळी त्याने म्हटलं होतं की, 'दिग्दर्शक म्हणून माझ्या आगामी चित्रपटाची घोषणा करताना मला खूप आनंद झाला आहे यासाठी आणि 'दिल चाहता है' चित्रपटाला 20 वर्ष होताहेत याहून अधिक चांगला दिवस घोषणा करण्यासाठी दुसरा कोणता असू शकेल. जी ले जरा हा शो सुरू करण्यासाठी उतावीळ झालोय,' असं फरहाननं ट्विटमध्ये लिहलं होतं.

'जी ले जरा' या चित्रपटाची कथा फरहान अख्तरने बहिण झोया अख्तर आणि रीमा कागतीसोबत लिहिली आहे.

हेही वाचा -

१. Parineeti Raghav wedding: राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा उदयपूरमध्ये दाखल, 'रागनिती' लगीनघाईला सुरुवात

२. Anil Kapoor Animal first look : 'अ‍ॅनिमल का बाप बलबीर सिंग'... अनिल कपूरचा 'अ‍ॅनिमल' फर्स्ट लूक

३. Rashmika Mandanna trolled : रश्मिका मंदान्ना ड्रेसवरुन ट्रोल, पाहा तिचा एअरपोर्ट लूक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.