ETV Bharat / entertainment

Netflix Tudum 2023 : आलिया भट्टने नेटफ्लिक्स इव्हेंटला गॅल गॅडोट, जेमी डोर्ननसह लावली हजेरी - गॅल गॅडोट

'हार्ट ऑफ स्टोन' या आगामी अ‍ॅक्शन चित्रपटात काम करणारी आलिया भट्ट नेटफ्लिक्स इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी ब्राझीलमध्ये आहे.

Netflix Tudum 2023
नेटफ्लिक्स तुडुम 2023
author img

By

Published : Jun 17, 2023, 2:40 PM IST

साओ पाउलो,ब्राझील : बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिचा आगामी अ‍ॅक्शन चित्रपट 'हार्ट ऑफ स्टोन'च्या रिलीजच्या तयारीत आहे. या चित्रटात तिच्यासोबत गॅल गॅडोट आणि जेमी डोर्नन हे देखील रूपेरी पडद्यावर दिसणार आहे. आलियासह गॅल, जेमी हे देखील तुडुम २०२३ मध्ये सहभागी होण्यासाठी नुकतेच ब्राझीलमध्ये गेले आहे. गॅलने शनिवारी या कार्यक्रमामधील एक व्हिडिओ शेअर केला आहे. इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शन दिले, 'सेट अप- द शॉट. व्वा! ओब्रिगाडा, ब्राझील!!' व्हिडिओमध्ये, गॅल आलिया भट्ट आणि जेमी डोर्नन यांच्यासोबत स्टेज शेअर करताना दिसत आहे. या कार्यक्रमात चाहत्यांनी तिघांना फार प्रोत्साहित केले आहे.

कार्यक्रमासाठी आलियाने केले सुंदर लूक : आलियाने या कार्यक्रमात राखाडी रंगाचे सूट परिधान केला आहे शिवाय तिने केसांची पोनीटेल बांधली आहे. तिने यावर तिचा मेकअप फार आकर्षक ठेवला आहे. या लूकमध्ये आलिया लेडी बॉस सारखी दिसत आहे. दुसरीकडे, गॅलने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये ती फार सुंदर दिसत आहे. यावर तिने तिचा मेकअप नॉर्मल ठेवला आणि केस खुले ठेवली आहे.

नेटफ्लिक्स तुडुम 2023 : आलियाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर व्हिडिओ शेअर करत लिहिले, हा पहिल्या दिवशी आहे... उद्या ब्राझीलला भेटू.' त्यानंतर लगेच अलियाने तिच्या इंस्टाग्रामवर गुलाबी रंगाच्या सूटमध्ये एक कोलाज फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले, 'ही बार्बी जेट लॅग्ड आहे'. आलिया 16 जून ते 18 जून या कालावधीत साओ पाउलो येथे नेटफ्लिक्स तुडुम 2023 ( Netflix Tudum 2023) या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ब्राझीलमध्ये गेली आहे. ती हॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या नेटफ्लिक्सच्या 'हार्ट ऑफ स्टोन' या अ‍ॅक्शन चित्रपटाच्या कलाकारांपैकी एक असल्यामुळे तिने या कार्यक्रमात सहभाग घेतला. टॉम हार्परने दिग्दर्शित केलेला, हार्ट ऑफ स्टोन हा टॉम क्रूझच्या मिशन इम्पॉसिबलच्या मालिकेतील पहिला हप्ता आहे. या चित्रपटात गॅल, जेमी आणि आलिया व्यतिरिक्त सोफी ओकोनेडो, मॅथियास श्वेघोफर, जिंग लुसी आणि पॉल रेडी यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट 11 ऑगस्टपासून नेटफ्लिक्स प्रदर्शित होणार आहे. अलीकडेच हार्ट ऑफ स्टोनच्या निर्मात्यांनी या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण केले होते. या चित्रपटाचे निर्माते लवकरच चित्रपटाचा ट्रेलर देखील रिलीज करणार आहेत. दरम्यान, आलिया वर्क्रफंट बोलायचे झाले तर ती दिग्दर्शक करण जोहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. 28 जुलैला या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. याशिवाय फरहान अख्तर दिग्दर्शित 'जी ले जरा' या चित्रपटात कॅटरिना आणि प्रियांका चोप्रासोबत रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

हेही वाचा :

  1. Katrina-Vicky Airport video : कॅटरिना कैफ आणि विक्की कौशलसोबत गप्पा मारताना आलिया झाली स्पॉट
  2. ZHZB box office collections Day 14 : 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाची 14 व्या दिवशी मंदावली बॉक्स ऑफिसवर कमाई
  3. Vijay Varma and Alia wedding photo : आलिया भट्टसोबत लग्नाचा फोटो पाहून विजय वर्माच्या आईला बसला होता धक्का, वाचा काय घडले..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.