मुंबई - Jawan OTT version: शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अॅटली यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या मल्टीस्टारर चित्रपटात शाहरुखशिवाय दीपिका पदुकोण, नयनतारा आणि विजय सेतुपती हे कलाकार आहेत. दरम्यान आता 'जवान'चा दिग्दर्शक अॅटलीनं चित्रपटाच्या सीक्वलबद्दल आणखी एक मोठी घोषणा केली आहे. अॅटली यांनी खुलासा केला की ते डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मसाठी 'जवान'च्या नवीन कटवर काम करत आहे.
'जवान' दिसेल ओटीटीवर : सध्या 'जवान' चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. 'जवान' चित्रपटानं भारतात 400 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. याशिवाय परदेशात या चित्रपटानं 735 कोटींची कमाई केली आहे. थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर, अॅटली 'जवान' चित्रपट ओटीटीवर चित्रपट प्रदर्शित करण्याची तयारी करत आहे. अॅटलीनं एका मुलाखतीत खुलासा केला आहे की, हा चित्रपट तो ओटीटीवर लवकरच प्रदर्शित करणार आहे. त्यानंतर अॅटलीनं हे सांगितल की, सध्या ओटीटीबद्दल त्यांचे काम सुरू आहे. 'जवान' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यानं ब्रेक घेतला नाही. सध्या तो ओटीटी प्रोजेक्टमध्ये काम करत आहे.
अॅटलीनं किंग खानचं केलं कौतुक : अॅटलीनं दिलेल्या मुलाखतीत त्याच्या आवडत्या दृश्याचा खुलासाही केला आहे. यावेळी त्यानं किंग खानचं खूप कौतुक केलं. अॅटलीनं सांगितलं की, कोरोनाच्या काळात मी या चित्रपटाची स्क्रिप्ट शाहरुखला सांगितली होती. मी त्यांना चित्रपटाची संपूर्ण कथा झूम कॉलवर सांगितली. शाहरुखनं या चित्रपटासाठी संमती दिली होती. कोविडच्या काळात चित्रपटगृहांमध्ये चित्रपटांना फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. त्याचबरोबर कमी बजेटचा चित्रपट करायला कोणताही अभिनेता तयार नव्हते. पण त्यावेळी शाहरुख हा एकमेव अभिनेता होता ज्यांनी या चित्रपटासाठी होकार दिला होता. आता आम्ही थांबणार नाही. आम्ही हा चित्रपट 3 दिवसातही ब्लॉकबस्टर बनविला आहे. शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट 7 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. 'जवान'नंतर आता शाहरुख खान त्याच्या आगामी 'डिंकी' चित्रपटात दिसणार आहे. 'डिंकी' हा शाहरुख खानचा या वर्षातील तिसरा चित्रपट असणार आहे. या चित्रपटात शाहरुख तापसी पन्नू स्क्रीन शेअर करताना दिसेल.
हेही वाचा :