मुंबई - Jawan day 1 box office prediction : शाहरुख खान आणि नयनतारा स्टारर 'जवान' चित्रपट रूपेरी पडद्यावर 7 सप्टेंबर रोजी सकाळी पहाटे 5 वाजता दाखल झाला आहे. 'जवान' हा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होताच किंग खानचे चाहते चित्रपटगृहाबाहेर आनंद साजरा करू लागले आहेत. तसेच चित्रपटगृहांध्ये देखील शाहरुख एंट्री होताच चाहते आपला आनंद नाचून आणि शिट्या वाजवून व्यक्त करत आहेत. यापूर्वी पठाणनं बॉक्स ऑफिसवर 540 कोटींहून अधिक कमाई केली होती. आता 'जवान' चित्रपट बॉक्स ऑफिसवर 'पठाण'चे रेकॉर्ड मोडेल असे सध्या दिसत आहे. 'जवान' चित्रपटाचा पहिला शो कोलकातामध्ये 5 वाजता सुरू झाला. त्यानंतर अनेक ठिकाणी या चित्रपटाचे शो 6 वाजता सुरू होऊ लागले.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'जवान' करू शकतो : शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट अंदाजे पहिल्या दिवशी देशांतर्गत 65-70 कोटी कमाई करू शकतो. ऑनलाइन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म बुक माय शोनुसार ( BookMyShow)'जवान'चे 7.5 लाख तिकिटे आधीच आरक्षित झाल्यामुळे हा चित्रपट चांगली कामगिरी करेल असे त्यांनी सांगितले आहे. सुरुवातीच्या दिवशी 10 लाख क्षमतेपैकी सुमारे 25 टक्के तिकिटे विकली आहेत, जी पीव्हीआर (PVR) आयनोक्स (INOX) स्क्रीनवर गुरुवारी विकल्या गेलेल्या 2.5 लाख तिकिटांप्रमाणेच आहे. ही खूप मोठी संख्या आहे. या आकड्यानुसार असे दिसून येत आहे की हा चित्रपट ओपनिंग खूप जोरदार करेल. 'या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचे कलेक्शन हे पठाण' पेक्षा मोठे असू शकते', असे पीव्हीआर (PVR) आयनोक्स (INOX)च्या कार्यकारी संचालक संजीव कुमार बिजलीने सांगितले आहे.
'पठाण' चित्रपटापेक्षा जास्त होईल ओपनिंग : प्रेक्षकांच्या अंदाजानुसार हा चित्रपट 65 ते 70 कोटी रुपयांचा ओपनिंग करू शकतो. 'पठाण'चा ओपनिंग डेचा आकडा 55 कोटी रुपये होता. त्यामुळे अशी आशा व्यक्त केली जात आहे की, हा चित्रपट पठाणपेक्षा जास्त कमाईल करेल. पठाण हा चित्रपट ब्लॉकबस्टर होता. या चित्रपटाने 1,050 कोटी रुपयांची कमाई केली होती. दिल्लीत G20 बैठकीमुळे 'जवान'ला थोडा फटका बसेल , मात्र तरीही हा चित्रपट रूपेरी पडद्यावर आपली जादू दाखवत प्रेक्षकांना चित्रपटगृहांमध्ये आकर्षित करण्यासाठी सज्ज आहे. विविध शहरांमध्ये तमिळ आणि तेलुगू आवृत्त्यांना देखील चांगला पाठिंबा मिळत आहे.
हेही वाचा :
- Shah Rukh Khan Jawan Movie : 'जवान' चित्रपटाद्वारे शाहरुख खाननं जिंकली चाहत्यांची मनं...
- Huddi film to release on 7th Sept: नवाजुद्दीनचा 'हड्डी' विनाअडथळा ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार, स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
- Sukhee Movie Trailer : शिल्पा शेट्टी स्टारर 'सुखी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; पाहा व्हिडिओ...