ETV Bharat / entertainment

Jawan box office collection day 6 : शाहरुख खान आणि नयनताराचा 'जवान' बॉक्स ऑफिसवर करत आहे धमाल.... - बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 6

Jawan box office collection day 6 : शाहरुख खानचा अ‍ॅक्शन 'जवान'नं थिएटरमध्ये रिलीज झाल्याच्या पाच दिवसांत भारतात 300 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. हा चित्रपट खूप झपाट्याने कमाई करत आहे. 'जवान' लवकरच 500 कोटीचा आकडा बॉक्स ऑफिसवर पार करेल असं सध्या दिसत आहे.

Jawan box office collection day 6
जवान बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 6
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 12, 2023, 11:22 AM IST

Jawan Box Office Collection Day 6 : शाहरुख खान स्टारर 'जवान' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटानं जगभर धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. शाहरुखचा 'जवान' सध्या एक इतिहास रचत आहे. रिलीजच्या अवघ्या पाच दिवसांत 'जवान'नं 300 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. फिल्म प्रोडक्शन हाऊस रेड चिलीज एंटरटेनमेंट निर्मित या चित्रपटाचं दिग्गदर्शन हे अ‍ॅटलीनं केलं आहे. हे वर्ष बॉलिवूडसाठी खूप खास आहे.

'जवान' बॉक्स ऑफिस कलेक्शन : 7 सप्टेंबर रोजी रिलीज झालेल्या शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटानं गेल्या पाच दिवसांत बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, शाहरुखचा 'जवान'नं पहिल्या दिवशी 75 कोटींची कमाई करून, हिंदी चित्रपटांच्या इतिहासात सर्वाधिक कलेक्शन करणारा पहिला चित्रपट ठरला आहे. रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 'जवान' चित्रपटानं देशभरातील बॉक्स ऑफिसवर 53 कोटींची कमाई केली. त्यानंतर तिसऱ्या दिवशी 77.83 कोटी, चौथ्या दिवशी 80.1 कोटी आणि पाचव्या दिवशी 30.5 कोटीचा व्यवसाय केला. यासह या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 316.16 कोटी झाले आहे. हा चित्रपट आता रिलीजच्या सहाव्या दिवसात आहे. 'जवान' चित्रपट सहाव्या दिवशी 27.50 कोटी कमाई करू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यासह या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 344.16 कोटी होईल.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'जवान' चित्रपटाची स्टारकास्ट : रेड चिलीज एंटरटेनमेंटनुसार, 'जवान'नं चार दिवसांत जगभरातील बॉक्स ऑफिसवर 350.47 कोटी रुपयांची कमाई केली. जागतिक बॉक्स ऑफिसवर 500 कोटींचा गल्ला पार करणारा हा सर्वात जलद चित्रपट ठरला आहे. 'जवान' चित्रपटानं पहिल्या 4 दिवसात बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. 'जवान'मध्ये शाहरुख खानशिवाय नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा, प्रियामणी, सुनील ग्रोव्हर आणि योगी बाबू हे कलाकार आहेत. याशिवाय या चित्रपटामध्ये दीपिका पदुकोण आणि संजय दत्तनं एक छोटीशी भूमिका साकारत आहेत.

हेही वाचा :

  1. Dharmendra Health : बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली, उपचारासाठी अमेरिकेला रवाना
  2. Fukrey 3 Song Out: 'फुक्रे 3' चित्रपटामधील पहिलं ट्रॅक झालं प्रदर्शित ; गाणं झाल व्हायरल....
  3. Pooja Bhatt And Shah Rukh Khan : पूजा भट्टनं वडील महेश भट्टसोबतच्या किसबद्दल केला खुलासा; शाहरुख खाननं दिली होती 'ही' प्रतिक्रिया...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.