ETV Bharat / entertainment

Jawan Box Office Collection Day 7 : 'जवान' बॉक्स ऑफिसवर गाठणार का 400 कोटींचा टप्पा? कमाईत सहाव्या दिवशी झाली घसरण - जवान

Jawan Box Office Collection Day 7 : शाहरुख खान स्टारर 'जवान' चित्रपट लवकरच देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 400 कोटींचा टप्पा गाठणार आहे. दरम्यान आता सहाव्या दिवशी 'जवान'च्या कमाईत थोडी घसरण पाहायला मिळाली आहे.

Jawan Box Office Collection Day 7
बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 7
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 13, 2023, 4:57 PM IST

मुंबई - Jawan Box Office Collection Day 7 : सुपरस्टार शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटानं पहिल्या वीकेंडमध्ये अनेक विक्रम मोडले आहेत. हा चित्रपट 7 सप्टेंबरला थिएटरमध्ये रिलीज झाला. आता हा चित्रपट रिलीजच्या सातव्या दिवसात आहे. 'जवान' सातव्या दिवशी 350 कोटीची कमाई करू शकतो, अशी शक्यता सध्या वर्तविली जात आहे. 'जवान'मध्ये किंग खान हा 5 वेगवेगळ्या अवतारात दिसला आहे. तसेच त्यानं या चित्रपटामध्ये दुहेरी भूमिका साकारली आहे. सध्या 'जवान' चित्रपटाचा जादू सहाव्या दिवशी कमी पडताना दिसत आहे. कारण काल या चित्रपटानं रूपेरी पडद्यावर कमी कमाई केली आहे.

जगभरात घालत आहे धुमाकूळ : सुपरस्टार शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाच्या कमाईचा आलेख सोमवारपासून घसरत आहे. या चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर 600 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. भारतीय बॉक्स ऑफिसबद्दल बोलायचे झाले तर मंगळवारपर्यंत या चित्रपटानं 345 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला. अ‍ॅटली दिग्दर्शित अ‍ॅक्शन 'जवान'नं खूप झपाट्यानं बॉक्स ऑफिसवर कमाई केली आहे. या चित्रपटानं हिंदी भाषेतील चित्रपटांचे जवळपास सर्व रेकॉर्ड तोडले आहेत.

'जवान' बॉक्स ऑफिस कलेक्शन : एका रिपोर्टनुसार किंग खान-स्टारर चित्रपटानं ओपनिंग डेला सर्व भाषांमध्ये 75 कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी 53.23 कोटी, तिसऱ्या दिवशी 77.83 कोटी, चौथ्या दिवशी 80.1 कोटी, पाचव्या दिवशी 30.5 कोटी आणि सहाव्या दिवशी 27.22 कोटीचा व्यवसाय केला आहे. हा चित्रपट सातव्या दिवशी 21.62 कोटी रुपयांची कमाई करू शकतो. त्यानंतर या चित्रपटाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 367.92 कोटी होईल. 'जवान' चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन 7 व्या दिवशी 20.57% नं कमी होत आहे. या चित्रपटाचा आताही खूप क्रेझ आहे. 'जवान' हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगूसह अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. 'जवान' चित्रपटात शाहरुख खानसह विजय सेतुपती, नयनतारा, सान्या मल्होत्रा आणि प्रियामणी प्रमुख भूमिकेत आहेत. दीपिका पदुकोण ही चित्रपटामध्ये कॅमिओमध्ये दिसली आहे.

हेही वाचा :

  1. Satinder Kumar Khosla Death : बिरबल हरपला, ज्येष्ठ विनोदी अभिनेते सतींदर कुमार खोसला काळाच्या पडद्याआड
  2. Happy birthday Prachi Desai : प्राची देसाईनं चित्रपटसृष्टीत कसं यश मिळवलं, जाणून घ्या तिचा आजवरचा प्रवास
  3. G20 summit : जी20 शिखर परिषदेसाठी बॉलिवूड सेलिब्रिटींनी दिल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.