मुंबई -
Janhvi Kapoor morphed pics : रश्मिका मंदान्ना आणि आलिया भट्ट यांसारख्या नामवंत अभिनेत्री असलेल्या डीपफेक व्हिडिओंनी सर्वांनाच धक्का बसला होता. काही महिन्यापूर्वी या विषयावर बरेच मोठे रान पेटले होते. डीपफेक्स समोर आल्यानंतर रश्मिका खूप निराश झाली होती आणि तिनं या कृत्यावर जोरदार टीकाही केली होती. अलिकडे जान्हवी कपूरनेही एका मीडियाशी संवाद साधताना दिलेल्या मुलाखतीत, तिच्या सुरुवातीच्या काळात तिची मॉर्फ केलेले फोटो पाहण्याचा तिचा अनुभव सांगितला. त्यावेळी या गोष्टीमुळे सर्वांचेच लक्ष वेधले जाईल या भीतीनं तिनं गप्प बसणे पसंत पडले.
जान्हवी कपूर नेहमी तिच्या दृष्टीकोनाबद्दल सडेतोड बोलत असते, स्वतःची मतं मांडत असते. तिने अलीकडेच खुलासा केला की ती किशोरवयात मॉर्फ केलेल्या फोटोंची शिकार झाली होती. या मुलाखतीत, तिने या अन्यायकारक कृतींविरुद्ध बोलल्याबद्दल रश्मिका मंदानाचे कौतुक केले आणि तिच्या अनुभवावरही प्रकाश टाकला. जान्हवीला असा विश्वास वाटतो की तिच्या संगोपनामुळे, तिच्यात असुरक्षिततेची भावना आहे, कारण ती मानते की लोकांसमोर अनेक आव्हाने आहेत.
जान्हवीने कबूल केले की तिला या फेरफार केलेल्या फोटोविरोधात बोलण्याचा अधिकार आहे याचीही जाणीव नव्हती. त्यामुळे रश्मिका आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या बाबतीत मोकळेपणाने व्यक्त झाली तेव्हा तिच्या या बिनधास्त वागण्याचं कौतुक वाटलं.
रश्मिका मंदान्नाचा मॉर्फ केलेला डीपफेक व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा तिच्या बाजून बॉलिवूडच्या अनेक सलेब्रिटींनी आवाज उठवला. अमिताभ बच्चन यांनीही या विरोधात भूमिका घेतली. त्यानंतर याची दखल भारत सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क मंत्रालयाला घ्यावी लागली. तातडीने यासाठीची चक्रे फिरली आणि या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू झाली. आगामी काळात अशी अप्रिय घटना घडू नये यासाठी ठोस पावलं उचलण्याचे निर्देश सरकारने दिल्यामुळे अशा गोष्टींवर आळा बसू शकतो, असा विश्वास यामुळे निर्माण होऊ शकला. याबाबतीत रश्मिकानंही ठाम राहून याला विरोध केल्यामुळे तिच्या या साहसाचे अनेक अभिनेत्रींनी उदाहरण स्वतःसमोर ठेवले आहे. यामध्ये श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरही सामील झाली आहे.
हेही वाचा -