ETV Bharat / entertainment

Jailer movie box office collection day 14 : सुपरस्टार रजनीकांतचा 'जेलर' चित्रपट देशांतर्गत लवकरच पार करेल ३०० कोटीचा आकडा...

सुपरस्टार रजनीकांतचा 'जेलर' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. हा चित्रपट देशांतर्गत ३०० कोटीचा टप्पा लवकरच पार करेल अशी अपेक्षा केली जात आहे.

Jailer
जेलर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 24, 2023, 10:57 AM IST

मुंबई : सुपरस्टार रजनीकांतने पुन्हा एकदा सिद्ध केले की तो भारतीय सिनेमाचा बॉस आहे. रजनीकांतच्या 'जेलर'ने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवसापासून चांगली कमाई केली आहे. 'जेलर'ने जगभरात ५०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे आणि भारतीय बॉक्स ऑफिसवर मोठी झेप घेतली आहे. हा चित्रपट रोजच अनेक रेकॉर्ड तोडत आहे. नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित या चित्रपटाने प्रेक्षकांना खूप प्रभावित केले आहे. या चित्रपटाची क्रेझ जगभरात पाहिला मिळत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी नोटा कमाई करत असला तरी, दुसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाच्या कमाईत घट नोंदवली जात आहे. 'जेलर'ने रिलीजच्या १४ व्या दिवशी किती कोटींची कमाई केली हे जाणून घेऊया...

१४ व्या दिवशी 'जेलर'ने किती कमाई केली : 'जेलर' चित्रपट १० ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. दरम्यान सकनिल्‍कच्‍या सुरुवातीच्या अहवालानुसार, मंगळवार, २२ ऑगस्ट रोजी 'जेलर'ने २१.९८ टक्के व्यापासह भारतात ४.५ कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर, चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या १४ व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या बुधवारी या चित्रपटाने ३.६५ कोटी कमावले आहेत. यानंतर १४ दिवसांची 'जेलर'ची एकूण कमाई २९५.६५ कोटींवर गेली होती. आता हा चित्रपट ३०० कोटींचा आकडा पार करण्यापासून काही पावले दूर आहे. चित्रपटाच्या कमाईचा वेग पाहता, शुक्रवारी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हा टप्पा पार करेल आणि आणखी एक विक्रम आपल्या नावावर करेल, असे दिसत आहे. या चित्रपटाने नुकताच जगभरातील बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. यासह, २०१८च्या '२.०' चित्रपटानंतर जागतिक स्तरावर ५०० कोटींचा टप्पा पार करणारा रजनीकांतचा हा दुसरा चित्रपट ठरला आहे.

काय आहे 'जेलर'ची कहाणी ? : 'जेलर' चित्रपटाच्या कहाणीबद्दल सांगायचे झाल्यास, ही बाप आणि मुलाची कहाणी आहे. या चित्रपटात रजनीकांत एका निवृत्त 'जेलर'च्या भूमिकेत दिसत आहेत. याशिवाय त्याचा मुलगा देखील पोलिस अधिकारी आहे. त्याची हत्या होते. त्यानंतर सूडाने पेटलेला 'जेलर' मुलाच्या मारेकऱ्यांना मारण्याची योजना आखतो. या चित्रपटात रजनीकांत व्यतिरिक्त विनायकन, रम्या कृष्णन, वसंत रवी यांनी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. जॅकी श्रॉफ, मोहनलाल, शिव राजकुमार आणि किशोर यांनी 'जेलर'मध्ये छोट्या भूमिका केल्या आहेत.

हेही वाचा :

Gadar 2 vs OMG 2 box office day 13: 'गदर २' आणि 'ओ माय गॉड २' हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर करत आहेत जबरदस्त कामगिरी...

Chandrayaan 3 Landing : मिशन मून आणि अवकाशवर आधारित बॉलिवूड चित्रपट...

Disha Parmar Vaidya : दिशा परमारने शेअर केला बेबी बंप फ्लॉंट करताचा फोटो...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.