मुंबई - मेगास्टार रजनीकांतचा अलिकडेच रिलीज झालेल्या 'जेलर' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळाला. गेली १९ दिवस 'जेलर'ची जादु बॉक्स ऑफिसवर सुरू आहे. नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित 'जेलर' चित्रपट यावर्षी सर्वाधिक कमाई करणारा तमिळ चित्रपट ठरला आहे. अॅक्शन कॉमेडी असलेल्या या चित्रपटाने भारतात ३१८ कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली आहे.
-
#Jailer WW Box Office#600CrJailer - HOUSE FULL shows even on 3rd Sunday helps the film to go past the magical ₹600 cr mark on the 18th day.
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) August 28, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
||#Rajinikanth #ShivaRajKumar | #Mohanlal|| #2Point0 was the FIRST film to enter this club from Tamil Cinema on the 10th day of its… pic.twitter.com/zVhTidnzbw
">#Jailer WW Box Office#600CrJailer - HOUSE FULL shows even on 3rd Sunday helps the film to go past the magical ₹600 cr mark on the 18th day.
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) August 28, 2023
||#Rajinikanth #ShivaRajKumar | #Mohanlal|| #2Point0 was the FIRST film to enter this club from Tamil Cinema on the 10th day of its… pic.twitter.com/zVhTidnzbw#Jailer WW Box Office#600CrJailer - HOUSE FULL shows even on 3rd Sunday helps the film to go past the magical ₹600 cr mark on the 18th day.
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) August 28, 2023
||#Rajinikanth #ShivaRajKumar | #Mohanlal|| #2Point0 was the FIRST film to enter this club from Tamil Cinema on the 10th day of its… pic.twitter.com/zVhTidnzbw
इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या मतानुसार रजनीकांतच्या जेलर चित्रपटाने सोमवारी भारतात सर्व भाषांमध्ये अंदाजे २.५० कोटी रुपयांची कमाई केली. २०१८मध्ये रिलीज झालेल्या २.० चित्रपटानंतर हा पराक्रम करणारा जेलर हा दुसरा चित्रपट ठरला आहे. ट्रेड विश्लेषक मनोबाला विजयबालन यांच्या म्हणण्यानुसार जेलरने रविवारी जगभरात एकूण ६०७.२९ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
-
The Record Maker 🔥😎
— Sun Pictures (@sunpictures) August 27, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Mega Blockbuster #Jailer in theatres near you!@rajinikanth @Nelsondilpkumar @anirudhofficial @Mohanlal @NimmaShivanna @bindasbhidu @tamannaahspeaks @meramyakrishnan @suneeltollywood @iYogiBabu @iamvasanthravi @mirnaaofficial @kvijaykartik @Nirmalcuts… pic.twitter.com/fvhJl6iFi7
">The Record Maker 🔥😎
— Sun Pictures (@sunpictures) August 27, 2023
Mega Blockbuster #Jailer in theatres near you!@rajinikanth @Nelsondilpkumar @anirudhofficial @Mohanlal @NimmaShivanna @bindasbhidu @tamannaahspeaks @meramyakrishnan @suneeltollywood @iYogiBabu @iamvasanthravi @mirnaaofficial @kvijaykartik @Nirmalcuts… pic.twitter.com/fvhJl6iFi7The Record Maker 🔥😎
— Sun Pictures (@sunpictures) August 27, 2023
Mega Blockbuster #Jailer in theatres near you!@rajinikanth @Nelsondilpkumar @anirudhofficial @Mohanlal @NimmaShivanna @bindasbhidu @tamannaahspeaks @meramyakrishnan @suneeltollywood @iYogiBabu @iamvasanthravi @mirnaaofficial @kvijaykartik @Nirmalcuts… pic.twitter.com/fvhJl6iFi7
रजनीकांतची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात तमन्ना भाटिया, वसंत रवी, योगी बाबू, रम्या कृष्णन आणि विनायकन यांच्या मुख्य भूमिका आहेत. 'जेलर' चित्रपटातून कन्नड सुपरस्टार आणि दिवंगत सुपरस्टार राजकुमार यांचा मुलगा शिवा राजकुमारचा तामिळ पदार्पण झाला आहे. या शिवाय जॅकी श्रॉफ आणि मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांनी चित्रपटातील त्यांच्या भूमिकेतून रंगत वाढवली आहे.
मेगास्टार रजनीकांत २०२१ मध्ये 'अन्नात्थे' चित्रपटात अखेरचे दिसले होते. या चित्रपटात त्यांच्यासह नयनतारा, खुशबू आणि कीर्ती सुरेश देखील होते. जेलरला मिळालेल्या यशानंतर रजनीकांत चेन्नईत सक्सेस पार्टी करताना दिसला होता. या पार्टीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
कामाच्या आघाडीवर रजनीकांतने 'जय भीम' या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल दिग्दर्शित आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. 'थलैयवा १७०' असे या चित्रपटाचे तात्पुरते शीर्षक ठरवण्यात आले आहे. लायका प्रॉडक्शन या गाजलेल्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती सुरू झाली आहे. संगीतकार अनिरुद्ध रामचंदर या चित्रपटासाठी संगीत देणार असल्याचेही समजते. रजनीकांतचा 'जेलर' चित्रपट जेव्हा रिलीज झाला तेव्हा साऊथ इंडियामधील त्याच्या चाहत्यांमध्ये एक उत्साह संचारल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. सकाळी सहापासून चित्रपटाचे शोज राज्यभरात सुरू झाले होते.
हेही वाचा -
१. Gadar 2 Vs Omg 2 Box Office Day 18: 'गदर 2'च्या तुलनेत बॉक्स ऑफिसवर घसरतेय 'ओ माय गॉड 2'ची कमाई....