ETV Bharat / entertainment

Jailer Box Office Collection Day 3 : रजनीकांत स्टारर 'जेलर' चित्रपटाने तीन दिवसांत १०० कोटीचा टप्पा केला पार... - बॉक्स ऑफिस

सुपरस्टार रजनीकांतचा 'जेलर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप कमाई करत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटीचा टप्पा पार केला आहे.

Jailer Box Office Collection Day 3
जेलर बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ३
author img

By

Published : Aug 13, 2023, 7:04 PM IST

मुंबई : साऊथ सुपरस्टार रजनीकांतचा 'जेलर' हा चित्रपट रूपेरी पडद्यावर आपली जादू प्रेक्षकांना चांगलीच दाखवत आहे. हा चित्रपट चाहत्यांनी सध्या डोक्यावर घेतला आहे. सध्या सिनेमागृहे तुफान गजबजली आहेत. त्यामुळे प्रदर्शित झाल्यानंतर तीन दिवसांतच 'जेलर' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित 'जेलर' चित्रपटाची देशभरात चर्चा होत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. भारताबरोबरच परदेशातही या चित्रपटाचा प्रचंड क्रेझ वाढत आहे. 'थलैवा' रजनीकांतची स्टाइल, डान्स, अ‍ॅक्शन, लुक अशा सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांना आवडत आहे.

जेलर बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ३ : सुपरस्टार रजनीकांतच्या 'जेलर' चित्रपटाने पहिल्या दिवशी जबरदस्त कमाई केली होती. सॅकनिल्कच्या मते या चित्रपटाने पहिल्या दिवशी ४८.३५ कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर पुढील दिवसांत या चित्रपटाने २५.७५ आणि ३५ कोटी रुपयांचा बॉक्स ऑफिसवर व्यवसाय केला आहे. देशांतर्गत या चित्रपटाने एकूण १०९. १० कोटी रुपये कमाविले आहे. या चित्रपटात रजनीकांत व्यतिरिक्त विनायकन, तमन्ना, शिवराजकुमार, मोहनलाल, योगी बाबू, सुनील आणि जॅकी श्रॉफ यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त सुरुवात केली.

रूपेरी पडद्यावर रजनीकांत करत आहे जादू : रजनीकांत हा दोन वर्षाच्या ब्रेकनंतर रूपेरी पडद्यावर परतला आहे. रजनीकांत हा शेवटी 'अन्नात्थे'मध्ये दिसला होता. 'जेलर' चित्रपटाचे चाहते रजनीकांतच्या चित्रपटाची जादू आणि त्याच्या एकूणच दमदार शैलीचा अनुभव घेत आहेत. रजनीकांतच्या लूकपासून ते त्याच्या स्टाईलपर्यंत सगळ्याच गोष्टींचे कौतुक सोशल मीडियावर होताना दिसत आहे. 'जेलर'मध्ये रजनीकांत पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. बंगळुरू आणि चेन्नईमधील अनेक कार्यालयमध्ये 'जेलर' रिलीजच्या दिवशी सुट्टी जाहीर केली गेली होती. इतर काही कार्यालयात सिनेमाची तिकिटे देखील मोफत वाटण्यात आली होती. 'जेलर' चित्रपटाला असंख्य रेकॉर्ड तोडण्यात यश मिळाले आहे. रजनीकांतच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी अनेक टप्पे गाठले. हा चित्रपट २०२३ मध्ये तामिळनाडूमधील सर्वात मोठा ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे.

हेही वाचा :

  1. Ankita Lokhande Father Death : अंकिता लोखंडेच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर...
  2. OMG 2 Collection Day 2 : 'OMG २' चित्रपट बॉक्स ऑफिसवर करतोय चांगली कामगिरी; जाणून घ्या दोन दिवसातील कमाई
  3. Sridevi's 60th Birthday : श्रीदेवीच्या वाढदिवसानिमित्त पती बोनी कपूर आणि मुलगी खुशी कपूर, जान्हवी कपूरने थ्रोबॅक फोटो केला शेअर..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.