ETV Bharat / entertainment

Jailer Collection Day 6: 'जेलर' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केला २०० कोटींचा टप्पा पार... - जेलर चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन

सुपरस्टार रजनीकांत स्टारर 'जेलर' चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर २०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. 'जेलर' चित्रपटाने रिलीजच्या सहाव्या दिवशी किती कोटींची कमाई केली, हे जाणून घेण्यासाठी वाचा...

Jailer Collection Day 6
जेलर कलेक्शन दिवस ६
author img

By

Published : Aug 16, 2023, 12:00 PM IST

मुंबई : सुपरस्टार रजनीकांतचा 'जेलर' चित्रपट हा बॉक्स ऑफिस चांगलीच कमाई करत आहे. 'जेलर' चित्रपट १० ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला. हा चित्रपट दररोज अनेक रेकॉर्ड मोडत आहे. सहा दिवसांत या चित्रपटाने देशांतर्गत २०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतली असून जगभरात हा चित्रपट ४०० कोटीच्या क्लबमध्ये सामील होईल असे दिसत आहे. हा चित्रपट लवकरच ५०० कोटीचा आकडा जगभरात पार करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 'जेलर' हा एक अ‍ॅक्शन मनोरंजन चित्रपट आहे ज्यामध्ये रजनीकांतसोबत शिव राजकुमार, मोहनलाल आणि जॅकी श्रॉफ महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसले आहेत. या चित्रपटाच्या जबरदस्त कामगिरीमुळे रजनीकांतची जादू अजूनही कायम असल्याचे सिद्ध झाले आहे.

'जेलर' चित्रपटाचे कलेक्शन : 'जेलर' चित्रपटाने मणिरत्नमच्या 'पोन्नियन सेल्वन पार्ट १'च्या कलेक्शनचा विक्रम सहा दिवसांत मोडला आहे. १५ ऑगस्ट रोजी, 'जेलर' चित्रपटाने एक उत्तम कलेक्शन केले आहे. सार्वजनिक सुट्टीचा चित्रपटाला खूप फायदा झाला. रिपोर्ट्सनुसार, 'जेलर'ने सहाव्या दिवशी सुमारे ३३ कोटीची कमाई केली आहे. यानंतर या चित्रपटाचे एकूण कलेक्शन २०७.१५ कोटींवर पोहोचले आहे. तामिळनाडूशिवाय केरळमध्येही 'जेलर' चित्रपटाची कामगिरी चांगली आहे. 'जेलर'ने पहिल्याच दिवशी देशांतर्गत ४८ कोटीची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने २५.७५ कोटी आणि तिसऱ्या दिवशी ३४ कोटीची कमाई केली होती. या चित्रपटाने तीन दिवसात १०० कोटीचा टप्पा ओलांडला होता. 'जेलर'ने तीन दिवसात एकूण १०८ कोटीचा व्यवसाय बॉक्स ऑफिसवर केला होता.

'जेलर' चित्रपटाची कहाणी : 'जेलर' चित्रपटाच्या कथानकाविषयी सांगायचे झाल्यास, ही बाप आणि मुलाची कहाणी आहे. या चित्रपटात रजनीकांत एका निवृत्त 'जेलर'च्या भूमिकेत दिसत आहेत. त्यांचा मुलगा पोलिस अधिकारी आहे. त्याची हत्या होते. त्यानंतर सूडाने पेटलेला 'जेलर' मुलाच्या मारेकऱ्यांना मारण्याची योजना आखतो. नेल्सन दिलीप कुमार दिग्दर्शित हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडत आहे. या चित्रपटात तमन्ना भाटियाचे एक आयटम साँग केले आहे. तमन्नाचे हे गाणे सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. या गाण्यात तमन्नासोबत रजनीकांत देखील थिरकताना दिसला.

हेही वाचा :

  1. Gadar 2 Collection Day 4 : 'गदर २' चित्रपटाने चौथ्या दिवशी 'इतकी' केली कमाई....
  2. Taali Web Series Released : सुष्मिता सेन स्टारर 'ताली' वेब सीरीज प्रदर्शित....
  3. Independence Day 2023 : स्वातंत्र्यदिनी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी चाहत्यांना दिल्या शुभेच्छा...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.