ETV Bharat / entertainment

Jailer box office collection day 10 : 'जेलर' चित्रपटाने १० दिवसात केली बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई... - जेलरतचे बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस १०

रजनीकांतचा 'जेलर' चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. या चित्रपटाने जगभरात ४०० कोटीचा टप्पा ओलांडला आहे.'जेलर'चा क्रेझ सध्या खूप वाढत आहे.

Jailer
जेलर
author img

By

Published : Aug 20, 2023, 1:48 PM IST

मुंबई : साऊथचा सुपरस्टार रजनीकांतची जादू ही रूपेरी पडद्यावरून कमी होताना दिसत नाही आहे. रजनीकांत स्टारर 'जेलर' चित्रपटाची क्रेझ १० दिवसांनंतरही संपलेली दिसत नाही. जगभरात या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे. 'जेलर'ने अवघ्या १० दिवसांत ३०० कोटींचा गल्ला गाठला आहे. एकीकडे सनी देओलचा 'गदर २' आणि अक्षय कुमारचा 'ओएमजी २' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत, तर दुसरीकडे साऊथचा सुपरस्टार रजनीकांतचा 'जेलर' चित्रपट हा प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करत आहे.

'जेलर'ची क्रेझ : 'जेलर' चित्रपटाने अवघ्या १० दिवसांत जगभरात ४०० कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. १० ऑगस्ट रोजी रजनीकांतचा 'जेलर' चित्रपट सिनेमागृहात दाखल झाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी विक्रम केला. रिलीज होऊन १० दिवस उलटले तरी रजनीकांतचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ निर्माण करत आहेत. 'जेलर'चे १०व्या दिवसाचे कलेक्शन जाणून तुम्हीही थक्क व्हाल, अशी कमाई या चित्रपटाने केली आहे.

'जेलर'ने जगभरातील रेकॉर्ड तोडले : सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, रजनीकांतच्या 'जेलर'ने दुसऱ्या शनिवारी देशांतर्गत १८ कोटींचा व्यवसाय केला. मंगळवारनंतर 'जेलर'ने शनिवारी सर्वाधिक कलेक्शन केले. ४८.३५ कोटींची सुरुवात झालेल्या रजनीकांतच्या 'जेलर'ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर २४५.९० कोटींचा व्यवसाय केला आहे. दुसऱ्या शुक्रवारी या चित्रपटाने फक्त १०.०५ कोटी रुपयांची कमाई केली, मात्र शनिवारी या चित्रपटाने कमाईच्याबाबतीत मोठी झेप घेतली आहे. 'जेलर'ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवरच नव्हे, तर जगभरातही रेकॉर्ड तोडले आहे . चित्रपटाचे जगभरातील कलेक्शन खूपच प्रभावी आहे. 'जेलर'ने जगभरात ४६८ कोटींची कमाई केली आहे.

'जेलर'ची स्टार कास्ट : 'जेलर'मध्ये रजनीकांतशिवाय अनेक दिग्गज कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. हिंदी सिनेसृष्टीतील जग्गू दादा म्हणजेच जॅकी श्रॉफने खास भूमिका साकारून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले, तर तमन्ना भाटिया, शिव राजकुमार आणि मोहनलाल यांसारख्या कलाकारांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने चित्रपटाला भुरळ घातली. हा चित्रपट खूप झपाट्याने बॉक्स ऑफिसवर कमाई करत आहे.

हेही वाचा :

  1. OMG 2 Box Office Collection Day 9 : 'गदर 2 'शी टक्कर असतानाही अक्षय कुमारचा ओएमजीचा १०० कोटींच्या कल्बमध्ये प्रवेश
  2. GADAR 2 VS PATHAAN : 'गदर २' आणि 'पठाण'चे पहिल्या आठवड्यातील कलेक्शन; 'तारा सिंह' रेकॉर्ड मोडू शकेल?
  3. Kangana Ranaut : रणौतने केली सनी देओलची पाठराखण, वाचा व्हिडिओवर काय दिली प्रतिक्रिया...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.