ETV Bharat / entertainment

Jailer advance booking: 'जेलर'ची अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच १९.४४ कोटींची कमाई, पिक्चर अभी बाकी है - Rajinikanths film likely to surpass

रजनीकांतच्या 'जेलर' चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघे काही तास उरले असताना चाहत्यांची आतुरता शिगेला पोहोचली आहे. नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित 'जेलर' चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला तुफान प्रतिसाद मिळाला असून वितरणातही लक्ष वेधणारे आकडे समोर आले आहेत.

Jailer advance booking
'जेलर'ची अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच १९.४४ कोटींची कमाई
author img

By

Published : Aug 9, 2023, 4:26 PM IST

मुंबई - रजनीकांतच्या आगामी 'जेलर' चित्रपटाची प्रतीक्षा चित्रपट शौकिन अत्यंत आतुरतेने करत आहेत. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट कमाल करेल, अशी जोरदार चर्चा आहे. कारण जेलरने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच १९.४४ कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट १० ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'जेलर' चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला मिळालेला हा उदंड प्रतिसाद प्रेक्षकांमध्ये असलेली चित्रपटाबद्दलचे प्रेम दर्शवते. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या मते, भारतात जेलर चित्रपटाने प्री-बुकिंगद्वारे १२.८ कोटी रुपये कमावले आहेत, ज्यात ११.७ कोटी रुपये तामिळ आवृत्तीचे आणि १.१ कोटी रुपये तेलुगू मार्केटमधून आहेत. अमेरिकेतही 'जेलर'ने चित्रपट पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या ठिकाणी तब्बल ३७ हजार तिकिटे विकली गेली आहेत आणि गल्ल्यामध्ये ६.६४ कोटी जमा झाले आहेत. अ‍ॅडव्हान्स बुकिंगचा अमेरिकेतील तिकीट विक्रीचा आकडा १ कोटी पार करेल असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

  • #Jailer Advance Booking (Opening Day): 🔥

    -> Bengaluru: 5.60+ Cr / 435 Sold Out/Fast Filling🔥
    -> Chennai: 3.50+ Cr / 650+ Sold Out/Fast Filling🔥

    It has good booking in North India too (for tamil version). ✅

    — Sacnilk Entertainment (@SacnilkEntmt) August 9, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

रजनीकांतच्या 'जेलर' चित्रपटाची जबरदस्त क्रेझ असल्यामुळे याच्या वितरणाचे हक्क १२३ कोटींना विकले गेले आहेत. यातील सर्वाधिक ६० कोटीचा हिस्सा एकट्या तमिळनाडू राज्यातला आहे. कर्नाटकमधून १० कोटी, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातून १२ कोटी आणि केरळ राज्यातून साडेपाच कोटीची तर उर्वरित भारतातून ४ कोटींची भर पडली आहे.

नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित 'जेलर' चित्रपटाच्या रिलीजच्या दिवशी दक्षिणेतील तामिळनाडूसह इतर राज्यातील शहरामध्ये अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर केली आहे. काही कंपन्यांनी तर तिकीटे खरेदी करुन त्याचे वाटप आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये केले आहे.

गेल्या महिन्याच्या सुरुवातील जेलर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. यातील थरारक प्रसंगांनी प्रेक्षक प्रभावित झाले होते. चित्रपटाच्या ट्रेलरमधील रजनीकांतचा आक्रमक अवतार, सडेतोड डायलॉगबाजी, वेगवान प्रसंग आणि अ‍ॅक्शन्स यामुळे चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे. जेलर चित्रपटातील कलाकारांमध्ये जॅकी श्रॉफ, प्रियंका मोहन, शिवा राजकुमार, तमन्ना भाटिया, रम्या कृष्णन, योगी बाबू, वसंत रवी आणि विनायकन यासारख्या लोकप्रिय बॉलिवूड आणि दाक्षिणात्य कलाकारांचा समावेश आहे.

हेही वाचा -

१. Mahesh Babu Birthday : अभिनयाच्या जोरावर महेश बाबूने गाजवले साऊथ चित्रपटसृष्टीत नाव....

२. Mahesh Babu And Prabhas : बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी भिडणार 'गुंटूर करम' आणि 'कल्की एडी २८९८'

३. Ranveer Singh to star in 'Don 3' : रणवीर सिंग बनणार 'डॉन ३', निर्मांत्यांनी केली अधिकृत घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.